अपघात हा रोज कुठल्या ना कुठल्या महामार्गावरती घडत असतो, अपघातात अनेकांना इजा होते तर अनेकांचे प्राणी जातात. कधी चुकीच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीमुळे, कधी रस्त्यांवरील असणाऱ्या खड्ड्यांमुळे तर कधी गाडीवरच नियंत्रण सुटल्यामुळे देखील अपघात होतात. अपघाताची अनेक कारणे आहेत, या अपघातामुळे अनेकांचे जीव जातात. अशीच एक दुःखद घटना घडली आहे यात एका घरातील स्त्रीचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार जण जखमी झाले.
भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर इतर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. राजश्री विजय पाटील असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. हा अपघात संगमनेर तालुक्यातील कऱ्हे घाटात घडला. याबाबत अधिक माहिती अशी की,नाशिक येथील रहिवाशी असलेले विजय नारायण पाटील, राजश्री विजय पाटील, चिन्मयी विजय पाटील, वनिता राजेश कुलकर्णी,
आदिती राजेश कुलकर्णी हे सर्व आपल्या वॅगनआर कारमधून पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात होते. ते संगमनेर तालुक्यातील कऱ्हे घाटात आले असता अचानक कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दरीत कोसळली.त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात, कारमधील राजश्री विजय पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर चौघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघातातील जखमींना संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अपघात होणं ही अचानक घडलेली घटना असते. मात्र रस्त्यांवरती वाहन चालवताना आपण आपली व आपल्या सोबतच्या प्रत्येकाची काळजी घेणं. फार महत्त्वाचं असतं. वाहतुकीचे सर्व नियम पाळणे हे देखील तितकच महत्त्वाचं असतं जेणेकरून वाढणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकतं आणि यामध्ये जीव जाणाऱ्यांचे प्रमाण आहे ते देखील घटू शकत.










