MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ऊसतोडणी कामगार महिलांसाठी मोफत माहेरची साडी व आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबीर.

by प्रशांत शेळके पा.
March 11, 2023
in पाथर्डी विभाग
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ऊसतोडणी कामगार महिलांसाठी मोफत माहेरची साडी व आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबीर.
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

शेवगाव प्रतिनिधी नरहरी शहाणे : गेल्या पाच वर्षांपासून उचल फाउंडेशन ही संस्था डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2018 पासून ऊसतोडणी कामगारांसाठी शेवगाव येथे विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. गेल्या काही दिवसांपासून उचल फाउंडेशनच्या माध्यमातून शेवगाव व परिसरातील ऊसतोडणी कामगार व त्यांची शाळाबाह्य मुले यांचा सर्व्हे सुरू आहे. काल दि.८ मार्च रोजी जागतिक महिला दिन असल्याने दरवर्षी प्रमाणे उचल फाउंडेशन परिवाराच्या वतीने हा महिला दिनही काही ऊसतोडणी कामगार महिलांबरोबर साजरा केला गेला.

या वेळी उचल फाउंडेशनच्या सौ. सुजाता खेडकर यांनी महिलांच्या समस्या जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता, महिलांच्या आरोग्यविषयक अनेक गंभीर बाबी समोर आल्या. त्यात एका गरोदर मातेने ऊसाच्या फडात बाळाला जन्म दिला. बाळाची नाळ तोडायला जवळ काहीच नसल्याने कोयत्याने नाळ तोडली. एका मातेला बालविवाह आणि लवकरच लादलेल्या गरोदरपणाने दोनदा मृत अर्भक जन्माला आली. अनेक महिलांना क्षमतेपेक्षा जास्त ओझे उचलल्याने कमरेचे, मानेचे त्रास होत होते. काही महिलांच्या डोळ्यास ऊसाचे पाचट लागून दृष्टीही गमवावी लागली असल्या एक ना अनेक समस्या महिलांनी बोलून दाखवल्या.

READ ALSO

लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

शासनाची व मूळ प्लॉट धारकाची फसवणूक प्रकरणी त्या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा – मनसेच्या वतीने तहसीलदार यांचेकडे मागणी.

आणि  अश्या काही घटना समोर आल्याने तात्काळ एक आरोग्य तपासणी शिबिर घेणे गरजेचे वाटले.  उचल फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. मनिषा लड्डा व डॉ. संजय लड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली  रोटरी क्लबच्या सहयोगातून या कामगार महिलांसाठी  तात्काळ एक आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर घेण्याचे ठरले. दि. ९ व १० मार्च रोजी गंगामाई सहकारी साखर कारखाना (घोटन) ता. शेवगाव येथे हे शिबिर घेण्यात आले.

या वेळी उपस्थित सुमारे तीनशे पेक्षा जास्त ऊसतोडकामगार महिलांची पूर्णतः मोफत आरोग्यतपासणी  औषधोपचार देऊन प्रत्येकी एक माहेरची साडी भेट म्हणून देण्यात आली. तसेच यावेळी उपस्थित शंभरहुन अधिक ऊसतोड कामगार पुरुषांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य तपासणीत प्रामुख्याने अतिश्रमाच्या कामामुळे महिलांच्या कंबर दुःखी, रक्त कमतरता(ऍनिमिया) हातपायास सूज व मुंग्या येणे, बालविवाह झाल्याने कुपोषित मुले किंवा मृत अर्भक जन्मास येणे. तसेच पुरुषांमध्ये वाढते दारू आणि मावाचे व्यसन, पोषक आहाराची कमतरता, यामुळे येणारा थकवा आणि कॅन्सर सारखे दुर्धर व्यधी, इत्यादी आजार प्रामुख्याने आढळले.

या शिबिरासाठी

डॉ. संजयजी लड्डा (जनरल फिजिशिअन),

डॉ. मनीषा लड्डा (स्त्रीरोग तज्ञ),

प्रा. अण्णासाहेब दिघे(लॅब टेक्निशियन),

डॉ. भागीनाथ काटे (फार्मासिस्ट),

डॉ.भरत गोरे (नेत्र तंत्रज्ञ सहायक),

सौ.सुजाता खेडकर (ICTC समुपदेशक)

आदींनी पुर्णतः मोफत वैद्यकीय सेवा दिली.

यावेळी कॉम्रेड संजय नांगरे हेही उपस्थित होते. तसेच उचल फाउंडेशन चे सिद्धार्थ लड्डा, सचिन खेडकर, महारुद्र खेडकर, अक्षय सरगुजर वैभव शिंदे यांनीही स्वयंसेक म्हणून काम पाहिले.  हॉटेल माथेरानचे गर्जे सर यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. खरतर कोणत्याही पूर्वनियोजनाशिवाय आयोजित केलेले हे शिबीर केवळ दि. ९ मार्चला एकाच दिवस घ्यायचे होते. पण महिलांच्या आरोग्य विषयक समस्या आणि त्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त  प्रतिसादामुळे हे शिबिर १० मार्चलाही म्हणजे सलग दोन दिवस घेण्यात आले.

प्रशांत शेळके पा.

Tags: AhmednagarFree maher saree and health checkup and medication camp for women sugarcane workers on the occasion of International Women's Day.MaharashtraPositive News
Previous Post

महिला दिनानिमित्त कृषी विभाग मार्फत तृन धान्याचे आहारातील महत्व बाबत मार्गदर्शन.

Next Post

“बँकिंग क्षेत्रातील रोजगारांच्या संधी” विषयावर व्याख्यान.

Related Posts

लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

August 12, 2023
शासनाची व मूळ प्लॉट धारकाची फसवणूक प्रकरणी त्या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा – मनसेच्या वतीने तहसीलदार यांचेकडे मागणी.

शासनाची व मूळ प्लॉट धारकाची फसवणूक प्रकरणी त्या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा – मनसेच्या वतीने तहसीलदार यांचेकडे मागणी.

August 12, 2023

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News