अहमदनगर : वाकडी (ता.नेवासा) येथील न्यू, इंग्लिश स्कूल, विद्यालयातील १७ वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने एकहाती विजय संपादन करत जिल्हास्तरावर विजय मिळविला ठरला. चंदनापुरी घाट (ता. संगमनेर) येथे नुकत्याच या स्पर्धा घेण्यात आल्या. यानिमित्त विजेत्या खेळाडूंचे, मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी वाकडीचे सरपंच संभाजी काळे उपसरपंच नानाभाऊ जाधव, प्रमुख पाहुणे मा.सरपंच अंकुश काळे. मुख्याध्यापक पवार, कामाक्षी शिक्षण संस्थेचे सचिव भुजबळ, विद्यालयाचे मार्गदर्शक सुरेश काळे क्रिडाशिक्षक संजय काळे, वांढेकर ढोकणे, भरत वाघमोडे, ढगे यासह सर्व शिक्षकेतर कर्मचारी वृंद ,पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी खेळाडू काळे साक्षी, काळे अक्षदा,काळे वैष्णवी, कार्ले शितल,काळे संस्कृती ,काळे दिव्या, कचरे काजल, ठोंबळ पायल,नवथर संस्कृती, गवांदे प्रियंका,कार्ले तेजस्विनी,गायकवाड प्रतिक्षा आणि त्यांना मार्गदर्शन करणारे काळे, भुजबळ, गोरे, पठाण यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन वांढेकर यांनी तर प्रास्ताविक सुरेश काळे यांनी केले. विजेत्या खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.










