अहमदनगर : जिल्हा परिषद अंतर्गत नगर तालुक्यातील निंबळक प्राथमिक शाळेत शालेय शिक्षण – क्रीडा विभाग, मुंबई व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,पुणे यांच्या निर्देशानुसार शाळा सुरक्षा कार्यक्रमांतर्गत ( स्कूल सेफ्टी प्रोग्राम ) मॉकड्रिलचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणार्थी नोडल शिक्षक राजेंद्र निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाले. मॉकड्रिलसाठी अहमदनगर जिल्ह्यातून एकमेव निंबळक या प्राथमिक शाळेची निवड करण्यात आली. या मॉकड्रिलसाठी भूकंप हा विषय घेऊन प्रात्यक्षिकाचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध थरारक प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी दाखविली. मॉकड्रिलसाठी होमगार्डचे पलटण अधिकारी संजय शिवदे, माधव हरवणे ,आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष बागले ,डॉ प्रशांत नांगरे ,डॉ दीपिका गाडे ,भाऊसाहेब बनगे सुरेश दळवी ,अग्निशमन कर्मचारी बाळासाहेब घाटविसावे, जिल्हा परिषद निरीक्षक जबीन शेख ,सुचिता टकले यासह पंचायत समिती उपसभापती डॉ. दिलीप पवार , सरपंच प्रियांका लामखडे , व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरक्षनाथ कोतकर ,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कोतकर ,दत्तू दिवटे , बी. डी. कोतकर ,प्रभारी मुख्याध्यापक सुखदेव पालवे नोडल प्रशिक्षणार्थी शिक्षक राजेंद्र निमसे , शरद जाधव ,दत्तात्रय जाधव , भागचंद सातपुते ,विशाल कुलट ,कल्पना शिंदे , अर्चना जाचक ,अलका कांडेकर , सुनिता रणदिवे , सुजाता किंबहुने , प्रज्ञा हापसे ,शैला सरोदे आदी उपस्थित होते. मॉकड्रिल चे प्रात्यक्षिक यशस्वीपणे सादरीकरण केल्याबद्दल जि प चे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील , गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव , हिंगणगाव केंद्रप्रमुख बाळासाहेब दळवी यांनी निंबळक शाळेचे अभिनंदन केले आहे. प्रास्ताविक राजेंद्र निमसे यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय जाधव तर आभार भागचंद सातपुते यांनी मानले .










