आष्टी प्रतिनिधी,
डॉ. अजय (दादा) धोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.
आनंद शैक्षणिक संकुल, आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित तसेच शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सर्व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने श्री. छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथे महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आनंद चॅरिटेबल संस्था, आष्टी सहसचिव तथा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य डॉ. अजितदादा धोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक श्री. राजू धोंडे, संस्था प्रशासनाधिकारी प्रा. शिवदास विधाते, श्री.दत्ता गिलचे, श्री. संजय शेंडे, श्री.शिवाजी वनवे, साहेबांचे स्विय सहाय्यक श्री. शिवाजी थोरवे श्री. सुभाष वाघ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम आरसूळ, अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्री साईनाथ मोहोळकर, औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील कोल्हे, कृषी तंत्रनिकेत प्राचार्य श्री. उद्धव घुले, पशुसंवर्धन विद्यालयाचे प्राचार्य श्री. किशोर ठाकरे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्री.संजय बोडखे, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत गोसावी सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
श्री अजित दादा धोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या चळवळीवर प्रकाश टाकला तसेच १ मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो याबद्दल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली याचबरोबर त्यांनी सर्व उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख श्री. सागर देसाईपाटील यांनी केले व आभार कृषी महाविद्यालय प्राचार्य डॉ श्रीराम आरसुळ यांनी मानले.










