नगर येथील भैरीAdventure यांनी दि.04.12.2022 रोजी रविवार च्या सुट्टीचे निमित्त साधत ‘कळसुबाई’ या महाराष्ट्रतील सर्वात उंच शिखराचा ट्रेक आयोजित केला होता त्यासाठी त्यांनी 22 जणांची निवड केली होती
विशेष म्हणजे यात सम्यक विनीत जाधव वय 4 वर्ष हा चिमुकलाही सहभागी झाला आणि शिखर सर करण्याचा विक्रम त्याने करून दाखवला सोबत सर्वात जास्त वय म्हणजे 55 वर्षाचे श्री सतीश पडोळे ही होते
याचे सर्व नियोजन आणि मार्गदर्शन नगरच्या भैरीAdventure चे श्री विनीत जाधव, श्री सचिन शिरसाठ, श्री प्रीतम घोरपडे यांचे होते याना ट्रेकिंग क्षेत्रात 10 पेक्षा जास्त वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. या निमित्ताने विनीत यांनी 7 वेळा तर प्रीतम यांनी 3 वेळ कळसुबाई ट्रेक पूर्ण केला
महिलांसाठी सौ सोनाली जाधव यांनी समन्वय साधला
ग्रुप सोबत महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील प्रा. मिलिंद अहिरे व सौ अहिरे तसेच सावेडी येथील श्री नरेंद्र कुलकर्णी (43) सौ अनघा कुलकर्णी (37) मुलगा पार्थ (15) सहकुटुंब सहभागी झाले सोबत
बाळासाहेब देशपांडे दवाखान्यातील डॉ. रेणुका जोशी-मुळे व मुलगी गार्गी जोशी(13) तसेच श्री विकास गायकवाड (28), चि योगेश डहारे (23), चि नागार्जुन बत्तीण (18), यांनी सहभाग नोंदवला
रविवारी पहाटे 04:45 ला चढाईला सर्वांनी सुरवात केली आणि 09:00 वाजता साधारण 4 तासात सर्व 22 जण शिखरावर पोहचले आणि घोषणांच्या जयघोषात सर्व आसमंत दुमदुमला त्यांनतर न्याहरी आणि गावरान जेवणाचा आस्वाद घेऊन सर्व जण सुखरूप परतले.











