समाजात अनाथ म्हणून वावरताना अनेक आणि अडचणी येतात अनाथांना कोणीही वाली नसल्याने अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो, अनेक विद्यार्थी आपल्या पालकांच्या सहकार्यामुळे यश संपादन करतात, मात्र ज्याचं लहानपणीच पितृछत्र हरवलं आणि नंतर आई देखील आजारपणामुळे कायमची निघून गेली त्यामूळे अक्षयच्या नशिबी अनाथपण आल.
घरची गरिबी, आई- वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले, त्यांना नंतर अक्षय ला आजोळी म्हणजे मामाच्या गावी सहारा मिळाला, मात्र शिक्षण त्याने हावरगाव येथील अक्षय उकरडे याचे बारावी पर्यंतचे शिक्षण जीवन विकास मुलांची निवासी आश्रमशाळा येथे पूर्ण केले. सुट्टी ला कधी मामा कडे येणं जाणे असाचे, त्यानंतर दुसऱ्यांच्या शेतात मजूरी करून आपल्याला दैनंदिन गरजा पूर्ण केल्या. कठीण परिस्थितीवर मात करून भारतीय सेनेच्या परीक्षेत यश प्राप्त केले आहे.
अनाथ असून देखील आपल्या स्वतःच्या पायावरती उभा राहायचं आणि स्वतः काहीतरी करण्याची जिद्द, त्याला शांत बसू देत नव्हती आणि त्यामुळे त्याने सैन्यात भरती होण्यासाठी तयारी सुरू केली. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा नाही जेणेकरून आपण चांगल्या अकॅडमी मध्ये जाऊन आपला प्रशिक्षण पूर्ण करू म्हणून त्यांनी सुरुवातीला गावाकडे मैदानाची तयारी सुरू केली. मात्र यामध्ये लेखी परीक्षेसाठी आता कुठेतरी अकॅडमीचा सहारा घ्यावा लागणार होता आणि त्यामुळे तो ज्या ठिकाणी विनामूल्य आपल्याला प्रशिक्षण दिले जाईल याच्या शोधात होता. राहुरी कृषी विद्यापीठ या ठिकाणी अग्नि भरतीच्या दरम्यान त्याला अहमदनगरच्या प्रहार अकॅडमीचे एक पोस्टर मिळाले आणि त्यामुळे त्याने प्रहार अकॅडमीशी संपर्क करण्याचा त्या अकॅडमीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला संपर्क करून स्वतःबद्दल संपूर्ण माहिती दिली. या
अनाथ विद्यार्थ्यांचा नगर मधील नगर औरंगाबाद रोड वरील प्रहार अकॅडमीने मोफत प्रशिक्षण देऊन त्याच्या उज्ज्वल भविष्या साठी मदत केली.
भारतीय सैन्य दलात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण झालं.फक्त जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अक्षयने मिळवलेलं हे यश प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.अक्षय जिवनात अनेकवेळा संघर्ष करावा लागला,आपण अनाथ आहोत हे प्रमाण पत्र मिळवण्यासाठी त्याला खूप वर्ष वाट पाहावी लागली अनाथाला केंद्रात आरक्षण मिळावं अशी मागणी अक्षय करतो .प्रत्येक वेळी संकट येत त्यातून त्याने मार्ग काढला त्यामुळे अक्षयच्या जिद्दीला सर्वजण सलाम करतात . काम केले आहे. काम करताना प्रचंड मेहनतीने त्याने प्रथम प्रयत्नात यश संपादित केले आहे. त्याचा खडतर प्रवास तरुणांना स्फूर्ती देणारा आहे










