पाथर्डी,,,प्रतिनिधी वजीर शेख
पाथर्डी तालुक्यातील पाडळी गावातील आईसाहेब क्रुषि सेवा केंद्र चे मालक श्री सोमेश्वर सुभाष भिसे, यांनी अँग्रिकल्चर ड्रोन, फवारणी यंत्र आणले आहे, याचे उद्घाटन श्री , संपतराव घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सुभाष भिसे, सुखदेव कचरे, ज्ञानेश्वर कचरे, नवनाथ ढाकणे ऑपरेटर जॉन ढगे, अंकुश काकडे, तसेच पाडळी,चितळी,ढवळेवाडी, येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते, ॲग्रिकल्चर ड्रोन एक फुट अंतर पासुन ते चाळीस फुट उंची पर्यंत फवारणी करता येते.

डाळींब, मोसंबी, द्राक्षे,ऊस, ,मका,अशा सर्वच फवारणी उत्कृष्ट पणे करते , शेतकऱ्यांना लागणारा वेळ ही वाचणार आहे, तसेच अहमदनगर जिल्ह्यात पहिलाच ॲग्रिकल्चर ड्रोन आहे , एका दिवसात किमान 12, एकर क्षेत्रावर फवारणी करत, तसेच हे बॅटरी चार्ज वर चालत आशा प्रकारे हे ॲग्रिकल्चर ड्रोन हे भाडेतत्त्वावर हि मिळणार आहे,असे सोमेश्वर भिसे यांनी सांगितले, यावेळी सर्वांचे आभार अंकुश काकडे यांनी मानले.










