शेवगाव प्रतिनिधी नरहरी शहाणे : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 व जागतिक महिला दिनानिमित्त माननीय तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले शेवगाव यांच्या वतीने स्वराज मंगल कार्यालय शेवगाव येथे “तृणधान्याचे आहारातील महत्त्व” याबाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. तृणधान्यास मानवी आहारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु नव्याने रुजत चाललेल्या पाश्चिमात्य संस्कृतीमुळे या गोष्टींचे आहारातील महत्त्व कमी होत चालले आहे. ग्रामीण त्याचबरोबर शहरी भागात तृणधान्यापासून बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थांना चांगली व्यवसाय संधी असल्याचे सांगण्यात आले. समाजामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, वरई आधी तृणधान्यांचे आहारातील सेवन वाढावे यासाठी तृणधान्याचा स्टॉल लावून जनजागृती करण्याच्या दृष्टीने महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. मंडळ कृषी अधिकारी चापडगाव श्रीमती. शितल नागवडे व कृषी सहाय्यक श्रीमती. मनीषा पवार, शितल आगळे, मृणालिनी रायकर, सविता बडे, मंगल प-हे, प्रतिभा उभेदळ ,गीतांजली शिरसाट सुवर्णा मुरदारे उपस्तित होत्या










