व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा यांना अटक करण्यात आली आहे. चंदा कोचर यांच्या पाठोपाठ सीबीआयने लोन फ्रॉड केसमध्ये मोठी कारवाई केली आहे. चंदा कोचर जेव्हा आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ होत्या त्यावेळी ३ हजार २५० कोटींचे लोन नियम डावलून व्हिडीओकॉन ग्रुपला लोन दिले होते. त्यानंतर व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचा आर्थिक फायदा करून दिला होत्या.

बँक आणि व्हिडिओकॉनचे शेअर होल्डर अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान, रिझर्व्ह बँक आणि सेबी यांना पत्र लिहून व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना आयसीआयसीआयच्या सीईओ आणि एमडी चंदा कोचर यांनी एकमेकांचा लोन प्रकरणात कसा फायदा करून दिला, या सगळ्या बाबी सविस्तर लिहिल्या होत्या. अरविंद गुप्ता यांच्या पत्रानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. १ मे २००९ ला आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ झाल्यानंतर चंदा कोचर यांनी बँकेचे नियम डावलून व्हिडिओकॉन ग्रुपचे प्रमोटर वेणुगोपाल धूत यांच्या कंपनीसाठी कर्ज मंजूर केले होते. चंदा कोचर या बँकेच्या सीईओ झाल्यानंतर पुढच्या दोन वर्षातच म्हणजेच २०११ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले होते.
ही सगळी बातमी उघड झाल्यावर बँकेच्या आणखी एका कर्मचार्याने थेट मॅनेजमेंटवर घोटाळ्याचे आरोप केले आणि चंदा कोचर देखील या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला. हे प्रकरण २०१८ मध्ये उघड झाले. या कर्मचार्याने हा आरोप केला होता की २००८ ते २०१६ या कालावधीत अनेक लोन अकाऊंट्सच्या तोट्यावर लक्ष देण्यात आले नाही. ३० मे २०१८ ला सेबीने चंदा कोचर यांना एक नोटीसही धाडली. त्यांना या सगळ्या नियमांची पायमल्ली का केली, ते विचारले गेले; मात्र त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. या प्रकरणाचा तपास पुढे जात होता त्यामुळे २०१८ च्या ऑटोबर महिन्यातच चंदा कोचर यांनी पदावरून मुदतीच्या आधी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ४ ऑटोबरला मंजूर करण्यात आला.२०१२ मध्ये व्हिडिओकॉन ग्रुपला आयसीआयसीआय बँकेद्वारे लोन देण्यात आले होते. हे प्रकरण नंतर एनपीए झाले. तसेच हा फ्रॉडही कसा झाला तेदेखील समोर आले.
२०२० मध्ये ईडीने या प्रकरणात दीपक कोचर यांना अटक केली. २०१२ मध्ये चंदा कोचर यांच्या नेतृत्वात बँकेने व्हिडिओकॉन ग्रुपला ३२५० कोटींचे कर्ज दिले. त्यानंतर वेणुगोपाल धूत प्रमुख असलेल्या सुप्रीम एनर्जीने मेसर्स न्यूपॉवर रिन्यूएबल्सला ६४ कोटींचे लोन दिले. या कंपनीत दीपक कोचर ५० टक्के भागिदारी होती. त्यामुळे हा सगळा घोटाळा कसा झाला ते समोर आले. या प्रकरणात वेणुगोपाल धूत यांना अटक करण्यात आली आहे.










