MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकाच्या वाहनचालकांचे थकीत वेतन मिळावे यासाठी कामबंद आंदोलन तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन.

by प्रशांत शेळके पा.
January 24, 2023
in नगर विभाग
102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकाच्या वाहनचालकांचे थकीत वेतन मिळावे यासाठी कामबंद आंदोलन तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन.
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 102 क्रमांकाच्या रुग्णवाहक वाहनचालकांचे थकीत वेतन मिळण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांना निवेदन देताना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, विजय मिसाळ, राहुल शिवशरण, बापूसाहेब वाघमोडे, सुधाकर खरात, बी.जी लांडगे, विकास जठर, दत्तात्रेय गवळी, एस.पी कसबे, दत्तात्रेय गायके, सौरव जाधव, माणिक निकम, शिवाजी देवकर, विजय दराडे, सय्यद फिरोज, पंकज खपके, सोमा येवले, संभा चव्हाण, जेम्स ससाने, बाबासाहेब नाईक, शंकर जाधव, अनिल हिगडे, अनिल गायकवाड, सुभाष नाईक, किरण गोरे, काशिनाथ नरवडे, साहेबराव थोरात, विनोद घुले आदीसह रुग्णवाहक चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अधिकाराखाली असणाऱ्या आरोग्य विभागातील कंत्राटी 102 रुग्णवाहिका वाहन चालकांचे मागील सहा महिन्याचे थकीत वेतन कंत्राट दाराकडे बाकी आहे नगरमध्ये जिल्हा परिषदेचे जवळपास 98 प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यासाठी 98 रुग्णवाहिका कार्यरत असून त्यावर तेवढेच कंत्राटी वाहन चालक कार्यरत आहेत. पूर्वीच्या कंत्राकदाराने ( मे.अष्टविनायक ट्रॅव्हल्स व ईश्वर ट्रॅव्हल्स ) यांनी देखील वाहन चालकांचे तीन महिन्याचे वेतन थकीत ठेवलेले असल्याने, वाहन चालकांना अनियमितपणे केलेले वेतन आणि वाहन चालकांच्या वेतनात केलेल्या तिरंगाईमुळे आपल्या विभागाने त्याला हटवून नवीन ठेकेदाराची नेमणूक केली.

READ ALSO

राजेंद्र वाघमारे यांना शिर्डी मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्षांकडे साकडे.

नेवासा शहराच्या आरोग्य सुविधेचे वाटोळे – ॲड.सादीक शिलेदार

ज्यामुळे या 98 वाहन चालकांचे व्यवस्थित व वेळेत वेतन मिळेल असे आपले अनुमान होते,परंतु या नव्याने कंत्राट दिलेल्या (मे.दृष्टी सिक्युरिटी व प्रसनल सर्विसेस जळगाव व विंसोल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे )या कंपनीने देखील पूर्वीच्या कंत्राटदारा प्रमाणेच वाहनचालकांच्या वेतनात दिरंगाई करून त्यांची पिळवणूक केलेली असल्याने, सर्वसामान्य कुटुंबातील असणाऱ्या वाहन चालकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे दैनंदिन गरज भागवण्याचे मोठे आव्हान वाहन चालकांन समोर उभे राहिले आहे. मागील आठवड्यात आम्ही याच प्रश्नावर मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांची भेट घेतल्याने कंत्राटधारा मार्फत वाहन चालकांच्या खात्यावर 11 हजार रुपये मासिक एवढे वेतन जमा केले .परंतु वाहनचालकांचे मागील दोन महिन्याचे राहिलेले वेतन सध्याच्या कंत्राकदाराकडे तसेच पूर्वीच्या कंत्राटदाराकडे तीन महिन्याचे असे एकूण पाच महिन्याचे वेतन सर्व वाहन चालकांचे थकीत आहे.त्याचप्रमाणे वाहन चालकांचा पीएफओ आणि विमा देखील कंत्राट दाराने भरलेला नसल्याने,उद्या कुठल्याही प्रकारचा अपघात झाल्यास त्या साठी सर्वस्वी कंत्राटदार आणि आपले प्रशासन जबाबदार असेल,याची नोंद घ्यावी. महोदय,या सर्व वाहन चालकांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता कोरोना काळात सर्वसामान्यांची रात्रंदिवस सेवा केली परंतु आज त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ केवळ ही केवळ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व कंत्राटदाराच्या नियोजन शून्य कारभारामुळेच आली आहे.

जिल्हा परिषदेच्या नियमानुसार शासनाकडून कंत्राटदाराला काही अटी घातलेल्या असतात त्यानुसार जिल्हा परिषदेकडे निधीचा अभाव असताना देखील कंत्राटदाराने सर्व वाहनचालकांचे वेळेवर वेतन अदा करणे बंधनकारक आहे,परंतु त्याच नियमाचा भंग संबंधित कंत्राट वाहनचालक संस्थेकडून होत असल्याने त्या कंत्राकदारावर कायदेशीर कारवाई करून मागील पाच महिन्याचे सर्व वाहनचालकांचे वेतन तत्काळ अदा करण्याच्या मागणीसाठी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले अन्यथा सर्व वाहन चालकास घेऊन संघटनेच्या वतीने आरोग्य अधिकारी यांच्या दालनात आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे..

प्रशांत शेळके पा.

Tags: A statement to the District Health Officer of the Zilla Parishad as well as a strike protest for the drivers of No. 102 Ambulance to get their due salary.AhmednagarMaharashtra
Previous Post

महाराष्ट्र राज्य होमिओपॅथीक डॉक्टर्स कृति समितीच्या वतीने सत्यजित तांबे यांना जाहीर पाठिंबा.

Next Post

अबब ! नगरमध्ये या भागात सापडले 11 फुटी अजगर; पाहताच हृदयाचे ठोके वाढल्याशिवाय राहणार नाही

Related Posts

राजेंद्र वाघमारे यांना शिर्डी मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्षांकडे साकडे.

राजेंद्र वाघमारे यांना शिर्डी मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्षांकडे साकडे.

June 30, 2023
नेवासा शहराच्या आरोग्य सुविधेचे वाटोळे – ॲड.सादीक शिलेदार

नेवासा शहराच्या आरोग्य सुविधेचे वाटोळे – ॲड.सादीक शिलेदार

June 30, 2023

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News