घरा समोर खेळत असलेल्या मुलाच्या हातात काय दिले. असे विचारल्याचा राग आल्याने आरोपींनी चिखा चव्हाण यांना लाथा बुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. दिनांक ६ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटने बाबत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
चिखा प्याजन चव्हाण, वय ४० वर्षे, राहणार मुलनमाथा, ता. राहुरी यांनी राहुरी पोलिस. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, चिखा चव्हाण हे त्यांच्या कुटुंबासह राहुरी शहरातील मुलनमाथा येथे राहतात. त्यांच्या शेजारीच त्यांचा भाऊ विश्वास पजन चव्हाण हा त्याच्या कुटुंबासह राहतो. दिनांक दिनांक दिनांक- ६ डिसेंबर रोजी सध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास चिखा चव्हाण हे घरात असताना त्यांचाआ नातु वंश सौरभ चव्हाण हा घरासमोर खेळत होता.
तेव्हा त्यांची पुतनी विशाखा हिने सौरभच्या हातात काही तरी दिल्याने चिखा चव्हाण यांनी तीला विचारले की, तु सौरभच्या हातात काय दिले. तेव्हा ती म्हणाली की, मी काही दिले नाही. तेव्हा चिखा चव्हाण यांचा भाऊ विश्वास हा तेथे आला व चिखा चव्हाण यांना मोठ मोठ्याने शिवीगाळ करु लागला. त्यावेळी इतर आरोपी तेथे आले. त्यांनी चिखा चव्हाण यांनी लाथा बुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच तु जर आमच्या नादी लागला तर तुला जिवंत मारुन टाकु, अशी धमकी दिली.
चिखा प्याजन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी १) आहेत. विश्वास प्याजन चव्हाण, २) बया फादर काळे, ३) किसन गवत्या काळे, ४) विशाखा बया काळे, ५ ) वनिता विश्वास चव्हाण, ६) वैष्णवी किसन काळे सर्व राहणार मुलनमाथा, ता. राहुरी यांचे विरुध्द गुन्हा रजि नं. १२५४ / २०२२ भादंवि कलम ४७, १४९ प्रमाणे मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक ए. एस. पालवे हे करीत









