पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख,
आदिनाथनगर, तालुका: पाथर्डी, जिल्हा: अहमदनगर येथील दादापाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालयात “बँकिंग क्षेत्रातील रोजगारांच्या विविध संधी” या विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करण्यासाठी श्री. अमित पाटील व श्री प्रशांत ढोले संचालक, संकल्प एज्युकेशन, छत्रपती संभाजीनगर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील रोजगाराच्या अनेक संधींबाबत मार्गदर्शन केले , त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), एलआयसी (LIC) यासारख्या परीक्षांशी संबंधित माहिती व्याख्याना मधून विद्यार्थ्यांना सांगितली .
विद्यार्थ्यांनी बँकिंग परीक्षेचा अभ्यास कसा करावा या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या व्याख्यानांमधून विद्यार्थ्यांना सांगितले की, तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात काम करण्याचे सर्वोत्तम कारण म्हणजे वेतन आहे असे वाटते. पण बँकिंग क्षेत्र वेतनाबरोबरच आपल्या कर्मचाऱ्यांना बँका त्यांच्या कर्जावर किमान व्याज दर, वैद्यकीय कव्हरेज, निवृत्तीवेतन लाभ आणि बरेच काही प्रदान करतात असे सांगितले. यावेळी सन्माननीय अतिथींना पुष्पगुच्छ महाविद्यालयाचे कॅलेंडर आणि नियतकालिक देऊन गौरविण्यात आले.
या व्याख्यानाचा ४५ विद्यार्थी आणि ०९ प्राध्यापकांनी लाभ घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य, मा. डॉ. आर. जे. टेमकर यांनी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नॅक समन्वयक डॉ. आर. टी. घोलप, ग्रंथपाल डॉ. आर. पी. घुले, प्रा. योगिता इंगळे व इतर शिक्षक उपस्थित होते. वाणिज्य शाखेचे प्रा.देविदास खेडेकर, प्रा. अर्चना नवले, प्रा. स्वाती सातपुते, प्रा. रामेश्वरी सरोदे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी वाणिज्य आणि अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. जे. देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. आर. जे. टेमकर, कार्यालयीन अधीक्षक श्री. विक्रमराव राजळे, डॉ.एस. आर. भराटे, महाविद्यालय परिसर विकास समितीचे अध्यक्ष मा.श्री. शिवाजीराव राजळे, कार्यकारि संचालक श्री महाजन यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.










