समीर शेख, जामखेड तालुका प्रतिनिधी :
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. पवारनिष्ठ असलेले व तालुक्यात स्वकर्तृत्वाने उभारी घेणारा एक मोठा नेता राष्ट्रवादी पक्ष सोडण्याची स्थितीत असून पुढील येणाऱ्या नवं वर्षात जामखेड तालुक्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे खात्रीलायक माहिती समोर आली आहे, पवारनिष्ठ ‘राष्ट्रवादी’ सोडत असल्याने हा पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.राष्ट्रवादी सोडल्यानंतर ते भाजप सेनेत जाणार का किंवा भाजप -राष्टवादी समोर तिसरा पर्याय ठेवणार नव्या इनिंगला सुरुवात करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
जामखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकामागे एक असे धक्के बसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून भाजप,शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक मोठा झटका बसण्याच्या मार्गावर आहे. कारण, कोणताही राजकीय वारसा नसताना विरोधीपक्षनेते अजित पवार यांचे विश्वासू व जिल्हा कार्याध्यक्षपासून ते कर्तृत्वाने थेट प्रदेशउपाध्यक्ष पदापर्यंत मजल मारणारे जामखेड तालुक्यातील एक बडा नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
या नेत्याने गेल्या दोन वर्षपासून कर्जत व जामखेड तालुक्यात सामाजिक कामाच्या माध्यमातून त्यांनी आपली स्वत्रंत्र यंत्रणा उभारली असून त्याच्या या उपक्रमाला कर्जत-जामखेड तालुक्यातील असंख तरुण जोडले असल्याचा दावा करण्यात आला आहे,अभ्यासू,संघर्षशील,स्वकर्तृत्वाने उभारी घेणारे नेतृव म्हणून ‘या’ नेत्याकडे पहिले जात आहे,मात्र पक्ष सोडण्याच्या शक्यतेने खळबळ निर्माण झाली आहे. त्याबरोबर आजून कोण कोणते कार्यकर्ते राष्ट्रवादी सोडणार याकडे लक्ष लागले आहे त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे व त्यांची पुढची भूमिका काय असणार याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.










