राहुरीच्या पोलीस स्थानकामध्ये एक खळबळ माजली आहे अनेक जण या ठिकाणी येत आहेत आंदोलन करत आहेत कारण राहुरी पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक यांच्यावरती जिनीला मनाची कारवाई केली जात आहे ती अत्यंत चुकीचे आहे या अधिकाऱ्यावरती अन्याय होत आहे यासाठी अनेक जण पोलीस स्टेशनच्या आवारात निषेध करत आहेत राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी आपल्या कामामुळे तालुक्यात एक वेगळी छाप निर्माण केली होती मात्र विधानसभेत त्यांच्यावर धर्मांतराचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात येत आहे म्हणून याचे पण सात तालुका भरात उमटताना पाहायला मिळतात
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचे पो.नि. प्रताप दराडे यांची बदली रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी सर्व पक्षीय संघटनांच्या वतीने अहमदनगर – मनमाड महामार्गावर शनिवारी (दि. २४) रस्तारोको आंदोलन केले आहे. या रस्तारोको आंदोलनात माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह विविध संघटना व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील धर्मांतर प्रकरणी पोलिसांनी केलेल्या हलगर्जी आणि दिरंगाई प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी पंधरा दिवसात केली जाईल, तोवर संबधित पोलीस निरीक्षक दराडे यांची आजच नियंत्रण कक्षात बदली करण्यात येईल असं गृह खात्याचे प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत जाहीर केलं, राम सातपुते यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती.










