दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी दिपक गणपतराव शिर्के यांना दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड – २०२२, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र, पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य, ऑल इंडिया अँटी करुप्शन आयोजित “महाराष्ट्र रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री. मेघराज राजे भोसले, प्रसिद्ध न्यूज अँकर, अभिनेत्री व समाजसेविका फरहान खान, प्रसिद्ध गायक, अभिनेत्री केतकी माटेगावकर, सिनेअभिनेते श्री. राम प्रभुणे,

लिज्जत पापड ग्रुप अध्यक्ष कोते सर, डी वाय एस पी. अनिल पवार, पोलीस निरीक्षक शामी पठाण, राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश सकुंडे, पोलीस मित्र राष्ट्रीय अध्यक्ष कैलास पठारे,

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश राठोड, कल्याणी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष सुनीता ताई मोडक आदी. अनेक सामाजिक, चित्रपट व कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.











