वडापाव म्हणजे साधा सोपा खमंग स्वादिष्ट असा विषय आहे, अनेकांना वडापाव आवडत असतो, अनेक जण आवडीने वडापाव खातात. काही जणांची फिक्स ठरलेली ठिकाण असतात. ज्या ठिकाणी जाऊन लोकं वडापाव खातात, ते ठिकाण ही फेमस झालं आहे .
प्रत्येक शहराची काही ना काही खासियत असते,प्रत्येक शहरात काही ना काही वेगळं खायला मिळत, आपण जर जो वडापाव प्रेमी असाल तर आपल्यासाठी ही बातमी आपल्याला तोंडाला पाणी आणणारी आहे .आजच्या जमान्यात खाद्य पदार्थांचे नवनवे ब्रँड उदयास येत आहेत. नगर शहरातील वडापावचेही असेच काही आहे. या शहरात चौकाचौकात वडापावच्या गाड्या दिसतात. या ठिकाणी मिळणाऱ्या वडापावची टेस्टही वेगळी असते. माणिक चौकातली झणझणीत वडापाव किंवा आता सर्वांना ठाऊक असणारा सोपानरावचा वडा… वडापावचे नाव जरी घेतले, तरी नगरकरांची जीभ चाळवते. काळानुसार या वडापावमध्ये बदल होत गेले. चव बदलली. सत्तरच्या दशकात मिळणारा वडापाव आणि आता मिळणारा वडापाव जाणवतो.
अहमदनगर मध्ये असाच स्वादिष्ट खमंग वडापाव मिळतो हा वडापाव 49 वर्षापूर्वी जन्माला आला होता. त्याचे नाव सोपानराव असे ठेवण्यात आलं आणि आजही माणिक चौकात सोपानरावांचा वडापाव हातगाडीवरती मिळतो, बाजारपेठेतून संपूर्ण खरेदी करून आल्यानंतर माणिक चौकातील सोपानराव चा वडापाव खाल्ल्याशिवाय पायाच शहरातून बाहेर निघत नाही, दर्जेदार ,फ्रेश पदार्थ वापरून हा वडापाव बनवला जातो, पूर्वीची जी टेस्ट होती तशीच टेस्ट आजही टिकून आहे
नगरमधील सोपानराव वडेवाले यांचे चिरंजीव विजय महांकाळ यांच्या मते नगरला सुमारे ४५ वर्षांपासून त्यांच्या वडिलांनी वडापावची हातगाडी लावण्यास सुरवात केली. त्याच दरम्यान शहरात अन्यत्रही वडापाव विकला जाऊ लागला. माणिक चौकातील सोपानराव यांचा वडापाव लिंबाखालचा वडापाव म्हणून सुरुवातीला ओळखला जात होता, हळूहळू यामध्येही थोडे बदल झाले. चौकात हातगाडी तर आहेच मात्र ग्राहकांना ताटकळत ठेवण्या पेक्षा बसण्यासाठी एक शॉप सुरू केलं.
खाद्यसंस्कृती ही वेगवेगळी आहे, नाव एकच पण चाविमध्ये फरक असतोच , जिभेला चटके बसले तरी खावासा वाटतो असा चमचमीत वडापाव पद्धतीशिर बनवला जातो . मसाल्यासाठी लागणारा भाजीपाला एकाच व्यक्तीकडून घेतला जातो ती व्यक्ती माल बदला जात नाही, बेसन पीठ घरी दळले जाते, तेल आणि पाव हे घासाला त्रासदायक ठरणार नाही असे वापरले जातात. तल्यानंतर हा वडापाव एकदम कडक दिसतो मात्र खाताना मऊ असतो ती या वडापावाची खासियत आहे.
आजही सोपानरावच्या वडापावाला एक वेगळीच चव आहे. आणि ती खाण्यासाठी जिल्हाभरातूनच काय तर राज्यभरातूनही मंडळी येत असतात, अनेक वडापाव येतील, जातील पण सोपानराव वडेवाल्याच्या वडापाव याची चव जिभेवर नेहमी रेंगाळत राहील.










