दिनांक ०७/०४/२०२३ रोजी फिर्यादीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, दिनांक २०७/०४/२०२३ रोजी सायंकाळी ६.०० याचे सुमारास इसम नामे मुस्तकिय इसहाक शेख रा बुरुडगांव रोड अहमदनगर याने त्याचे मोबाईलच्या व्हॉटसअॅप स्टेटसवर दोन समाजामध्ये धार्मीक तेढ निर्माण होईल असा स्टेटसला व्हिडीओ ठेवला आहे अशा आशयाच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ३३४/२०२३ भादंवि कलम ५०५ (२) प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासुन आरोपी फरार झालेला होता.
दि.१७/०४/२०२३ रोजी रात्री कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, सदर गुन्ह्यातील फरार आरोपी नामे मुस्तकिय इसहाक शेख रा बुरुडगांवरोड, अहमदनगर हा त्याचे राहते घरी येणार आहे अशी गुप्त माहिती मिळाल्याने कोतवाली पोलीस स्टेशन पोनि / चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी त्यास ताब्यात घेतले असुन पुढील तपास हा पोसई/कचरे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कालकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोहेकॉ /तनवीर शेख, पोहेकॉ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना अब्दुलकादर इनामदार, पोकों/संदिप थोरात, पोकों/कैलास शिरसाठ, पोको सोमनाथ राऊत, पोक अमोल गाडे, पोकों सुजय हिवाळे, पोकों सागर मिसाळ यांच्या पथकाने केली आहे.










