महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन उसतोडणी करणारे उस तोड मजूरांच्या पाचवीला कष्ट पुजलेले असतात, पोराबाळांचं खाणंपिणं, कपडालत्ता, दुखणं-खुपणं भागवण्यासाठी कारखान्याकडून घेतलेल्या उचलीची पै न पै फेडण्यासाठी पती पत्नी राबत असतात दोघाना ही कारखान्यावर उसतोडीसाठी जाव लागत. वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी हातात कोयता घेऊन पोटाला चिमटे घेत छाती फुटेपर्यंत काबाडकष्ट करावे लागतात.गोड साखरेची कडू कहाणी अनेकांना माहित हि नसेल ,कारण उसापासून साखर ,गुळ बनवला जातो, मात्र या उसाला तोडणारे हात मात्र अनेक वेदना सोसत असतात, उन वारा काश्याची हि तमा न बाळगता आपल्या कुटुंबाच्या उदार्निर्वाहासाठी अनेक जन उस तोड करून भटकंती करत असतात. असे उस तोड करणार एक कुटुंब अनेक वर्षापूर्वी पारनेर तालुक्यातील निघोज येथे आल आणि इथेच थांबल, याच उस तोड मजुराचा मुलगा कवी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जाऊ लागला आहे.
पौळाचीवाडी (मोठा तांडा) नावाच्या एका छोट्याशा तांड्यावर संदीप राठोडचा जन्म झाला,कुटुंबात मोठा भाऊ दिलीप, मी अन् लहान बहीण शिला हे तीन भावंडे आई वडील हाताला मिळेल ते शेतमजुरीचे काम करण्यासाठी जायचे तेव्हा झोपडीची राखण करीत बाहेर खेळायचे, बाहेर उघडी नागडी खेळणारी मुलं पाहून, वराळ गुरुजी वडिलांना म्हणायचे कि यांना शाळेत घाला.
वडीलांना वाटत असे आपल्या मुलांनी ऊसतोड मजूर होऊ नये, मुलांनी खूप शिकव नोकरी करावी म्हणून त्यांनी एका ठिकाणी मुंलासाठी थांबून घेतल, गुरुजींनी आधार दिला आणि मुलांची शाळेचा श्रीगणेशा झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण निघोज येथेच झाले. शालेय जीवनात लिखाणाची आवड निर्माण झाली , मात्र शिक्षण घेऊन नोकरी करावी अस वडिलांचं मत होत, पण महाविद्यालयीन घेताना अनेक अडचणी आल्या.मात्र सगळ्यावर मात करत बीए बीएड पूर्ण केल,पण नोकरी मिळाली नाही, म्हणून शिकवणी घेण सुरु केल.यातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
जीवनातला संघर्ष सुरूच होता तस लिखाण हि सुरु होत, वेदेनेला लेखणी वाट मोकळी करत होती त्यामुळे साहजिकच सामाजिक कविता कडे कल जास्त होता, त्यांची कोयता हि कविता लोकप्रिय झाली त्या कवितेने त्यांना कवी संदीप राठोड अशी ओळख निर्माण झाली त्यांना आतापर्यंत सहा पुरस्कार मिळाले,सर्वत्र त्याचं भरभरून कौतुक होऊ लागल, उस तोड मजुराचा मुलगा एवढ्या उत्तमपणे लिहितो आपलं दुख कवितेतून मांडतो म्हणून त्यांच्या कवितेची वेगळी छाप पडते, त्यांच्या कवितेंचा संग्रह व्हावा यासाठी मित्र मंडळी एकत्र येत त्यांनी आपल्या या कवी मित्राच्या कविता संग्रहाची निर्मिती केली, श्री मुलिकादेवी विद्यालय निघोज २००३ मधील इयत्ता १० वीचे एका वार्गातले सर्वजन एकत्र येत त्यांनी ‘भूक छळते तेव्हा’ हा कविता संग्रह प्रकशित केला










