प्रहार करिअर अकॅडमी व भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र अहमदनगर येथील प्रशिक्षण केंद्रातील 2022 च्या अग्नीविर भरतीतील अकॅडमी चा अकरावा अग्नीवीर जवान चिरंजीव तुषार सतीश पवार याचा नाशिक जिल्ह्यातील तालुका येवला -नांदूर गावचे सरपंच समस्त गावकरी व पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला .प्रहार करिअर अकॅडमीतून 2022 मध्ये सर्वात जास्त प्रशिक्षणार्थी आर्मी एअर फोर्स मध्ये भरती झाल्यामुळे ग्रामस्थ व पालकांच्या वतीने प्रहार अकॅडमीच्या सर्व शिक्षक व प्रशिक्षक तसेच पदाधिकारी यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.
भारतीय सैन्य दलात सिग्नल कोर मध्ये निवड झालेल्या तुषार पवार व त्याच्या पालकांचे आदरणीय आमदार मा . मंत्री बच्चू कडू यांनी फोन द्वारे शुभेच्छा देऊन गौरवउद्गार प्रकट केले या कार्यक्रमास सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहून भावी सैनिकांचा सत्कार करून एका आदर्श समाज परंपरेचे दर्शन घडविले .आपल्या अध्यक्षीय भाषणात अकॅडमीचे संचालक मेजर विनोद सिंग परदेशी यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विविध भरती प्रक्रिया विषयी माहिती देताना जास्तीत जास्त युवकांनी आपली शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन घेता आर्मी पोलीस वायुसेना नौसेना इत्यादींची तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले तसेच ॲकॅडमी चे सीईओ मेजर प्रदीप निपुंगे यांनी आज पालकांनी सतर्क राहून आपल्या पाल्याचा पाया भक्कम करण्यासाठी त्याच्या शारीरिक बौद्धिक मानसिक व शैक्षणिक प्रगतीकडे वेळीच लक्ष देणे कितपत गरजेचे आहे हे समाजातील विविध अनुभवाच्या माध्यमातून प्रस्तुत करून अकॅडमीने हे यश कसे संपादित केले याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकॅडमीचे प्राचार्य प्राध्यापक मालोजी शिकारे सर यांनी करत अकॅडमीच्या अभ्यासक्रम दिनचर्या व संस्कार इत्यादी विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात वीरमाता -पिता वीर पत्नी यांचाही सन्मान आदर्श शेतकरी पैलवान सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला तुषारचे आप्तेष्ट व स्वकीय सोबत अकॅडमीतील सहकारी मित्र वेठेकर अजय ,भागवत थोरात, कार्तिक पिल्ले ,धुमाळ ओंकार, मोरे आदित्य , वाळुंज अथर्व सह अनेक मान्यवर प्राचार्य विठ्ठल गायकवाड सर .प्राचार्य धनंजय पेहरकर सर, प्रगतशील शेतकरी बाबुराव किसन सोनवणे ,शिक्षक नारायण डोखे सर ,माजी सैनिक तथा विद्यमान पोलीस नारायण पेहरकर सर ,इत्यादींची शुभेच्छापर भाषणे झाली .तसेच प्रहार संघटनेचे येवला तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन उपाध्यक्ष वसंत भाऊ झांबरे यांनी आलेल्या उपस्थित मान्यवरांचे आभार प्रकट केले .










