व्यवसाय सुरू करताना अनेक अडीअडचणी येत असतात, बऱ्याचदा नफा तोटा ही होत असतो.आपल्या स्वतःचा छोटासा का होईना व्यवसाय असावा असं प्रत्येकाला वाटतं मात्र व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठी अडचण येते ती म्हणजेच पैशाची , अश्यावेळी अनेक जण सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेतात.या मध्ये अनुदान ही मिळतं त्याचा फायदा व्यवसायाच्या वाढीसाठी होतो.
अहमदनगर मधील विश्वास आणि किरण या दोघा भावांनी आपला स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला, सध्या मार्केट यार्ड येथील महात्मा फुले चौकात फूड ट्रक तर नगर – पुणे महामार्ग वर भेळ सेंटर सुरु केले. सुरुवातीला हातगाडीवरती ते भेळ विकायचे त्यानंतर व्यवसायात प्रगती होत गेली आणि स्वतःच सुंदर असं रेस्टॉरंट सुरू केल, माञ त्यांना आपल्या व्यवसायात अनेक बदल करायचे होते त्यासाठी त्यांना पैशाची चणचण जाणू लागली. सरकारी योजनांची माहिती काढली , त्या अंतर्गत खादी ग्रामोद्योग महामंडळ मधून CMEJP मधून अनुदान घेतले.
यासाठी त्यांनी सरकारच्या अनुदान योजनाचा फायदा घेतला मुख्यमंत्री सहायता निधी मुख्यमंत्री. CMEGP साठी त्यांना खादी ग्राम उद्योग महामंडळ सहकार्य मिळालं. दहा लाख अनुदान मिळवून त्यांनी आपल्याला व्यवसायात बदल केले.
वडिलांचं अचानक निधन झालं घराचा पूर्णपणे भार विश्वास याच्यावरती आला, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपण काही तरी छोटासा व्यवसाय सुरू करावा असे त्यांना वाटलं आणि त्यामुळे त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली सुरुवातीला हात गाडीवरती ते भेळ विकू लागले त्यांच्या भेळीला चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे त्यांनी हळूहळू फूड ट्रक त्यानंतर मुख्य रस्त्यावरती रेस्टॉरंट अशी यशस्वी वाटचाल केली. इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा सहज आणि सोपा नव्हता असं ते आवर्जून सांगतात. कारण भेळ विकणे हा छोटा व्यवसाय सुरू केल्यानंतर अनेकांनी नावे ठेवली मात्र या सगळ्या गोष्टी बाजूला सारून त्यांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला आणि आज यामध्ये यशस्वी झाले.










