MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

नगर स्पेशल पापड भाजी, अशी पापड भाजी फक्त नगर मध्येच मिळणार !

by प्रशांत शेळके पा.
January 4, 2023
in MH16 स्पेशल
नगर स्पेशल पापड भाजी, अशी पापड भाजी फक्त नगर मध्येच मिळणार !
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

अहमदनगर मधील खवय्यांना हलकाफुलका असा वाटणारा आणि चवीलाही तितकाच स्वादिष्ट वाटणारा पापड भाजी हा पदार्थ सर्वांना खूप आवडतो , पापड भाजी म्हटलं की नेमकं काय असे अनेकांना वाटतं असते. आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पापड खातो, मात्र पापड भाजी असा ही पदार्थ असू शकतो का?

तर हो ,नगरच्या कापड बाजार पेठेत चवीला फक्कड असणारी पापड भाजी मिळते, कारण बऱ्याचदा आपण पापड हे उडदाचे मुगाचे किंवा आणखी वेगळ्या प्रकारचे पाहत असतो आणि त्या पापड्यांसोबत भाजी हे कॉम्बिनेशन थोडंसं वेगळं वाटतं अहमदनगर मध्ये मिळणारी ही पापड भाजी एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने बनवली जाते, पापड भाऊजी हा पदार्थ एक्सीडेंटली बनलेला आहे .

READ ALSO

सरकारी योजनेचा लाभ घेत सुरु केला व्यवसाय; आज कमवत आहेत लाखो रुपये.

ना थाट, ना लखलखाट; सोपानरावचा वडापाव आहे एकदमच भन्नाट !

समोसाच्या उरलेल्या पिठाच्या बारीक काप करून तळले आणि सोबत बटाटा भाजी दिली. हे कॉम्बिनेशन ग्राहकांना आवडले, या नंतर मग कडक पापड तयार झाला ,वर गरमागरम भाजी या चवीला कुठे तोडच नाही. हा पापड कसा तयार होतो. अनेकांना हा पापड खूप आवडतो , यात मैदा, रवा, तेल, ओवा, जिरा आदी पदार्थांचे मिश्रण करून त्यापासून पापड लाटला जातो. हा पापड तळल्यानंतर त्याला चांगला कडकपणा येतो. त्यानंतर त्यावर बटाटा, वटाणा, मूगडाळ, हरभरा डाळ, पालक, कोथिंबीर, टोमॅटो आदींपासून तयार केलेली भाजी टाकण्यात येते. त्यावर चिंचेचे पाणी, कांदा व मिरची टाकली जाते. हातात कडक पापड व त्यावर गरमागरम भाजी आल्यावर पापडाचा तुकडा तोडून तो भाजीत बुडवून खाताना नेहमीचा पापड खातानाचा कुरमकुरम आवाज व समवेत आंबट-तिखट भाजीची लज्जतदार चव चिभेला तृप्तीची अनुभूती देते.

साधारणपणे १९७० च्या दरम्यान नगरमध्ये पापड भाजी मिळण्यास सुरुवात झाली. त्या काळी या पापड भाजीची किंमत १५ पैसे होती,’ असे पापड भाजी विक्रीचा तीन पिढ्यांपासून व्यवसाय करणाऱ्या खंडेलवाल परिवारातील आनंद खंडेलवाल सांगतात. ‘नगरच्या बाजारपेठेत खरेदीसाठी आल्यानंतर नागरिक आवर्जून पापड भाजी खाण्यास येतात. आता तर नगर जिल्ह्यासह पुणे, मुंबई, औरंगाबाद अशा राज्याच्या विविध भागातील नागरिक आमच्याकडे पापड भाजी खाण्यास येत असतात. सुरुवातीला १५ पैशांना मिळणारी पापड भाजी आता ३५ रुपयांना मिळते.

या पापड भाजीला खंडेलवाल यांच्या आईचा हात लागतो आपण म्हणतो ना आईच्या हातला चव च काही वेगळी असते, हे पापड लाटणे साठी आई मदत करते , आमची पापड भाजी सर्वांना आवडते आनंद होतो अस त्या आवर्जून सांगतात.

प्रशांत शेळके पा.

Tags: AhmednagarAhmednagar FoodFoodMaharashtraNagar special papad bhajiPapad Bhajisuch papad bhaji will be available only in the city!
Previous Post

जामखेड तालुक्यातील बडा नेता राष्ट्रवादीतुन बाहेर पडण्याच्या मार्गावर; नव्या वर्षात होऊ शकतो राजकीय भूकंप. नेता कोण याकडे सर्वांचे लक्ष.

Next Post

असं काय घडले कि, डॉ. भास्कर मोरे यांच्या ” रत्नदीप मेडिकल कॉलेज ” च्या विद्यार्थ्यांनीने उचलले टोकाचे पाऊल ?

Related Posts

सरकारी योजनेचा लाभ घेत सुरु केला व्यवसाय; आज कमवत आहेत लाखो रुपये.

सरकारी योजनेचा लाभ घेत सुरु केला व्यवसाय; आज कमवत आहेत लाखो रुपये.

March 6, 2023
ना थाट, ना लखलखाट; सोपानरावचा वडापाव आहे एकदमच भन्नाट !

ना थाट, ना लखलखाट; सोपानरावचा वडापाव आहे एकदमच भन्नाट !

December 8, 2022

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News