मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नैताळे येथील शेतकरी श्री वाल्मिक बोरगुडे हे रविवार दिनांक १० सप्टेंबरपासून नैताळे येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषचा काल तिसरा दिवस असुन काल छावा मराठा सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा सुनिल भाऊ भोर यांच्या उपस्थितीत तसेच संघटनेचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री पोपट भाऊ पा पताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थित जाहीर पाठिंबा देण्यात आला.

पाढिबा देण्यासाठी संघटनेचे दिंडोरी तालुकाध्यक्ष विष्णू वाघेरे दिंडोरी तालुका उपाध्यक्ष भास्कर पताडे इगतपुरी तालुका संपर्क प्रमुख नितिन राव इगतपुरी तालुका संघटक रुषीकेश वाबळे, तानाजी भाऊ भोर तसेच नाशिक जिल्ह्यातील व निफाड तालुक्यातील कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.











