MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

आता आ.राम शिंदे होणार २०२४चे खासदार ! यामुळे विखेंची धाकधुक वाढणार?

by प्रशांत शेळके पा.
April 18, 2023
in कर्जत विभाग, सध्याची बातमी
आता आ.राम शिंदे  होणार २०२४चे खासदार ! यामुळे विखेंची धाकधुक वाढणार?
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

 अहमदनगरचे माजी पालकमंत्री आणि भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांनी या आज एक राजकीय बॉम्ब टाकला आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक असून पुढील वर्षभर त्याची जोरदार तयारी करणार असल्याची घोषणा प्रा. शिंदे यांनी आज अहमदनगरमध्ये केली. भारतीय जनता पक्षाने मला पूर्वी राज्यसभेवर पाठविण्याची तयारी केली होती. मात्र, पुढे काही कारणामुळे ते राहून गेले. त्यानंतर २०१४ मध्ये मी लोकसभेसाठी इच्छूक होतो. तेव्हाही उमेदवारी मिळाली नाही. आता २०२४ ला मी तयारीशी उतरणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

त्यामुळे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांची मात्र धाकधुक वाढणार आहे. शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या घोषणेचे विविध अर्थही काढले जाऊ शकतात ,सध्याचे खासदार डॉ. विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता शिंदे यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगून मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. खरे तर शिंदे विधानसभेची निवडणूक लढवतील. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि शिंदे यांच्यात पुन्हा लढत होईल, असे येथील राजकीय वर्तुळात गृहित धरले जात होते. मात्र, शिंदे यांनी वेगळीच घोषणा केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘भाजपने मला पूर्वी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यास संगितले होते. त्यासाठी तयारीही केली होती. मात्र, नंतर पक्षाचा निर्णय बदलला आणि ते राहून गेला.

READ ALSO

आमरण उपोषणकर्ते शनिवार दिनांक १६/०९/२०२३ रोजी आत्मदहन करणार आहे.

उपोषणाला छावा मराठा सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचा पाठिंबा.

नंतर मला विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. त्यामध्ये मी निवडूनही आलो. २०१४ मध्ये मी आमदार असताना माझी नसली तरी कार्यकर्त्यांची इच्छा होती की, मी लोकसभेची निवडणूक लढवावी. आमदार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून मीही त्यासाठी तयार झालो होतो. त्यावेळी मी, प्रताप ढाकणे आणि दिलीप गांधी असे तिघे इच्छूक होतो. यात गांधी यांना उमेदवारी मिळाली. पक्षाचा निर्णय मान्य करून त्यांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न केले.

२०२४ च्या निवडणुकीत मी विधानसभेची निवडणूक तर लढणार आहेच. मात्र आता लोकसभा निवडणूक लढविण्यासाठीही मनाची तयारी ठेवली आहे. जर आता तशी राजकीय परिस्थिती आलीच तर लोकसभा निवडणूकही लढवायची असे मी ठरविले आहे. पक्षाचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे यावेळी मी लोकसभा निवडणूक लढविण्यासही तयार आहे,’ असेही शिंदे म्हणाले.

प्रशांत शेळके पा.

Tags: AhmednagarMaharashtraNow A. Ram Shinde will be the MP of 2024! Will this increase the fear of Vikhe?
Previous Post

पिडीत महिलेच्या कुटुंब पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांना चर्मकार वि. सं. प्रदेशाध्यक्ष खामकर यांनी दिले निवेदन.

Next Post

केडगावला रंगला हनुमान चालिसा व भजन संध्याभावभक्तीचा महोत्सवात भाविक तल्लिन

Related Posts

आमरण उपोषणकर्ते शनिवार दिनांक १६/०९/२०२३ रोजी आत्मदहन करणार आहे.

आमरण उपोषणकर्ते शनिवार दिनांक १६/०९/२०२३ रोजी आत्मदहन करणार आहे.

September 14, 2023
उपोषणाला छावा मराठा सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचा पाठिंबा.

उपोषणाला छावा मराठा सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचा पाठिंबा.

September 14, 2023

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News