महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या वतीने नगर शहराचे जिल्ह्याला वीजपुरवठा करण्यात येतो. आज अनेक भागांमध्ये परस्परित्या विजेचा खेळ खंडोबा झाल्याचे पाहायला मिळत आहे अनेक भागांमध्ये कमी व उच्च दाब वीज मिळत असल्यामुळे तेथे सुद्धा उद्योजकांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे या नुकसानीमुळे त्या नागरिकांना अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकलेली नाही एवढीच एक भाग वाचताना दुसरीकडे नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनेवर सुद्धा वेळोवेळी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे आजही नगर शहराला वर्षातून शंभर दिवस पाणी मिळू शकत नाही ही सुद्धा परिस्थिती पाहिल्यावर विजेचा खेळखंडवा झाला आहे असे म्हणावे लागेल तर दुसरीकडे आता सर्वसामान्यांना विजेचा मोठा फटका बसलेला आहे जे नेहमीचे बिल आहे यामध्ये सुमारे 17 टक्क्याने वाढ करण्यात आलेली आहे ही अतिशय भयावक परिस्थितीची वाढ असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका आता बसू लागलेला आहे

वीज ग्राहकांना शॉक राज्यात एककिडे उन्हाचा पारा वाढत असताना राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वितरण कंपन्यांनी आपल्या वीज दरात भरमसाठ वाढ करून जनतेला ऐन उन्हाळ्यात शॉक दिला आहे. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा आणि अदानी पॉवर या वीज वितरण कंपन्यांनी आपल्या वीज दरात वाढ केली आहे. या तीन कंपन्यांपाठोपाठ उर्वरित महाराष्ट्राला वीज पुरवणारी महावितरण या कंपनीने देखील वीज दरवाढ करण्याच्या निर्णय घेऊन ग्राहकांना झटका दिला आहे. वीज दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना तसेच छोट्या आणि मोठ्या उद्योगांना बसणार आहे. आधीच महागाईने होरपळलेल्या राज्यातील जनतेसाठी ही दरवाढ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना….. अशीच आहे.

राज्यातील जनता या वीज दरवाढीने त्रस्त होणार आहे. अन्य राज्यात विजेचे दर नियंत्रणात आहे शिवाय त्या राज्यात अखंड २४ तास वीज पुरवली जाते. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात मात्र अजूनही भार नियमन केले जाते शिवाय अधूनमधून अशा वीज दरवाढीचा शॉकही जनतेला दिला जातो. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज सर्वात महाग आहे. गुजरात, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, केरळ, पंजाब, राजस्थानसह अन्य राज्यांमध्ये विजेचे दर महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. या राज्यांना किफायतशीर दरात ग्राहकांना वीज पुरवणे शक्य होते तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला किफायतशीर दरात वीज पुरवणे का शक्य होत नाही? महावितरण कंपनी गेल्या अनेक वर्षापासून तोट्यात आहे. महावितरण कंपनीने ५४ टक्के दरवाढीची मागणी राज्य वीज नियामक मंडळाकडे केली होती. आयोगाने ३१ टक्के वीज दरवाढीला मंजुरी दिली. मुळातच महावितरण ही तोट्यात आहे. महावितरणची थकबाकी जवळपास ७० हजार कोटींची आहे. कोट्यवधींची थकबाकी असताना ती वसूल करण्यासाठी महावितरणने काय प्रयत्न केले असा प्रश्न आहे.

इतकी मोठी थकबाकी असणे हे महावितरण कंपनीचे अपयशच आहे हे अपयश लपवण्यासाठी महावितरणने हा वीज दरवाढीचा शॉक ग्राहकांना दिला आहे. ७० हजार कोटी रुपये थकबाकी असल्यानेच महावितरण कंपनी आज तोट्यात गेली आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे मात्र हा महसुली तोटा नेमका का होतो, याची करणे शोधून त्यावर खंबीर उपाययोजना करण्याची मानसिकता आजही दिसून येत नाही. शेवटी याचा फटका नियमित वीजबिल भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांना बसतो. विजेच्या वितरण आणि वाटपात होणारी गळती, विजेची महाराष्ट्रभर होणारी चोरी आणि विजेचे योग्य ते बिल भरण्यात मोठमोठे ग्राहक करीत असलेली हेळसांड यामुळे हा महसुली तोटा वाढत आहे. अनेक मोठे उद्योजक देखील मीटर आणि वीज मापन यंत्रात घोटाळे करुन सर्रास वीजचोरी करतात. वीज वितरण कंपन्यांनी नियमित वीजबिल भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक देण्याऐवजी राज्यातील वीजगळती, वीजचोरी आणि वसूल न होणारी बिले या आघाड्यांवर तातडीने लावले टाकावीत. जर या गोष्टी थांबल्या तर वीज वितरण कंपन्यांची महसुली तूट भरून निघेल आणि सर्वसामान्य प्रामाणिक वीज ग्राहकांना दिलासा मिळेल मात्र महावितरण नियमित वीजबील भरणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणार नाही असेच या क्षणी वाटते कारण १ एप्रिल पासून आणखी १७ टक्के दरवाढ करण्याची परवानगी महावितरणला राज्य वीज नियामक आयोगाने दिली आहे याचाच अर्थ पुढील वर्षी देखील वीज दरवाढीचा भडका उडणार असून वीज वितरण कंपन्या प्रामाणिक वीज ग्राहकांनाच शॉक देणार आहे.

याप्रसंगी युवा सेना सहसचिव विक्रम अनिलभैय्या राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर ,अभिषेक कळमकर , शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव ,नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, दत्ता जाधव ,योगी गाडे, अमोल येवले, संतोष ग्यानप्पा , संदीप दातरंगे, संजय सायगावकर, डॉ श्रीकांत चेमटे, अरुण झेंडे,गौरव ढोणे, संतोष धमाल, दीपक भोसले, शरद कोके, पंकज राठोड, नरेश भालेराव, सुनील भोसले,अक्षय नागापुरे, जालिंदर वाघ, महेश शेळके आदि शिवसैनिक उपस्थित होते .
--- विक्रम अनिल भैय्या राठोड.... 🚩🚩🚩










