हिंदू मुस्लिम धर्मावरून सध्या वातावरण खराब चालू आहे आणि त्यात सध्या एका मुस्लिम कंडक्टर सोबत एक हिंदू महिला भांडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि ती महिला सध्या Tweeter वर ट्रोल होत आहे. एका महिला प्रवाशाने बंगरूळ बसच्या कंडक्टरने मुस्लिम टोपी घातली म्हणून आक्षेप घेतला आहे आणि यावरून वाद घातल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पण या व्हिडिओमागे नेमका काय प्रकार आहे व्हिडिओमध्ये महिला काय म्हणते ते जाणून घेऊ,
यामध्ये व्हिडिओ शूट करणारी महिला मुस्लिम समुदायातील कंडक्टरला लक्ष करत आहे तुम्ही ऑन ड्युटी असताना मुस्लिम टोपी कशी काय घालू शकता असा जाबच कंडक्टरला ती विचारत आहे यावर कंडक्टर नम्रपणे त्या महिलेला सांगतो की, ” आजवर माझ्या टोपी घालण्यावर कोणी आक्षेप घेतला नाही त्यामुळे मी ही टोपी घालत आहे.”
यावरती महिला म्हणते की,” तुम्ही तुमचा धर्म हा घरी आचरणात आणा पण तुम्ही ड्युटीवर असताना मुस्लिम टोपी घालू शकत नाही.” यावर कंडक्टर म्हणतो की ” मॅडम मी अनेक वर्षापासून ही टोपी घालत आलोय ” सदरील संभाषण यावरच थांबत नाही तर महिला सातत्याने त्याला तुम्हाला टोपी घालण्याची परवानगी कोणी दिली असं विचारत राहते यावर तो कंडक्टर तिला वैतागून म्हणाला की, ” जे काही बोलायचं असेल ते आमच्या अधिकाऱ्यांशी बोला.”
ही महिला कंडक्टरने आपली टोपी काढलीच पाहिजे असा आग्रह धरून असते आणि म्हणते, ” तुम्ही ती टोपी मशिदीत किंवा घरात घातली तर हरकत नाही पण कामावर असताना टोपी घालने चुकीचा आहे.” शेवटी कंडक्टर वैतागून टोपी काढतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ट्विटर वरील वापरकर्त्यांनी महिलेला चांगलेच टार्गेट केले आहे तसेच या महिलेवर टीका देखील केली जात आहे.









