आपल्या महाराष्ट्रातील मातीतील मैदानी खेळ , महाराष्ट्राची परंपरा आणि आपली संस्कृती जपणारा रांगडा खेळ म्हणजेच बैलगाडा शर्यत याच मातीतील खेळाबद्दल आदित्य राजे मराठे प्रोडक्शन निर्मित “नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत”हा चित्रपट 26 मे 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे.

आणि विशेष म्हणजे या चित्रपटातील सर्व कलाकार हे महाराष्ट्राच्या मातीतलेच आहेत म्हणजेच शेतकरी आहेत. या चित्रपटाचे निर्माते आदित्य राजे मराठे असून चित्रपटाचे दिग्दर्शक चेतन सागडे आहेत, आणि प्रमुख भूमिकेत आदित्य राजे मराठे, ऐश्वर्या दौंड, अनिल नगरकर हे आहेत.
या चित्रपटात खलनायकाची भूमिका करणारे आमचे लहान भाऊ अजय वर्पे यांची भूमिका आहे. तरी हा चित्रपट सर्वांनी नक्की बघावा. या चित्रपटातील नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत या गाण्याने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे आणि नक्कीच हा चित्रपट आपल्या सर्वांना आवडेल अशी माझी अपेक्षा आहे.








