लग्नातले नवरदेव आणि नवरीचे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर बऱ्याचदा पाहिले असतील, यामध्ये बऱ्याच वेळेस त्यांचे प्रेम, डान्स किंवा भांडण पाहायला मिळत असतात मात्र या लग्नामध्ये एक आगळा वेगळा व्हिडिओ समोर आला आहे
या व्हिडिओमध्ये एका नवरीचा राग पाहायला मिळत आहे. भर मंडपामध्ये नवरीने असं काही केलं आहे की, लग्नामध्ये उपस्थित असलेले हैराण झाले आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की नवरदेव नवरीला आपल्या हाताने मिठाई खाऊ घालत असताना नवरीला नवरदेवाचा इतका राग येतो की, त्याच्या हातातील रसगुल्ला घेते आणि थेट खालीच फेकून देते.
रागीट नवरी बाईचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की वधू व वर स्टेजवर उभे आहेत. नवरीला रसगुल्ला खाऊ घालण्यासाठी नवरदेव पुढे येतो पण ती मिठाई खाण्यासाठी नवरीची तयारी नसते आणि म्हणून ती मिठाई खाण्यास चक्क नकार देते नंतर नववधूचा राग आऊट ऑफ कंट्रोल होतो आणि संतापलेली नवरी रसगुल्ला हातात घेते व लोकांसमोरच फेकून देते
यानंतर ती नवरदेवाला ग्लासमध्ये पाणी देते व नवरदेव हे पाणी पिण्यास नकार देतो आणि मग नवरीचा पारा आणखीनच चढतो आणि ती नवरी त्याच्या हातातून तो ग्लास घेते आणि तो देखील समोर जमिनीवर फेकून देते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या अनेक वेगवेगळ्या कमेंट्स आहेत यामध्ये बरेच जण असे देखील म्हणत आहेत की, नक्कीच हे लग्न मुलीच्या इच्छेविरुद्ध होत आहे आणि म्हणून ती या लग्नात इतकीवैतागलेली दिसत आहे.









