गाडी चालवताना सर्व नियम माहित असल्याला हवेत, नाही तर मोठे अपघात होऊ शकतात, तसाच एक प्रकार आहे, एका महिलेची चूक खुप भारी पडली,गाडी किंवा बाईक चालवताना महिला कशा पडतात? याचं चित्रण या व्हिडीओंमध्ये केलं जातं. काही काही व्हिडीओ पाहून तर हसावं की रडावं हेच कळत नाही.
असाच एक अजब व्हिडीओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. एका महिलेनं ब्रेक ऐवजी एक्सीलेटवर पाय दाबला आणि गाडी थेट दुकानात नेली. पप्पांच्या परीमुळे अख्ख्या दुकानाचा चक्काचूर झालाही घटना गुजरातमधील वडोदरामध्ये घडली आहे. तर त्याचं झालं असं की, एक महिला दुकानातून शॉपिंग करून घरी जात होती.
तिनं आपलं सामान गाडीत ठेवलं. आणि ती गाडी रिव्हर्स घेऊ लागली. पण तेवढ्यात तिच्याकडून एक लहानशी चूक घडली. तिनं ब्रेक ऐवजी एक्सीलेटवर पाय दिला. परिणामी गाडी थेट दुकानात शिरली. दुकानाची भिंत काचेची असल्यामुळे गाडी काच फोडून आतमध्ये शिकली अन् अख्ख्या दुकानाचा चक्काचूर केला. सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही
या प्रकरणी कायदेशीर तक्रार केली असून महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण ही घटना तिच्याकडून चुकून घडली. त्यामुळे दुकानात झालेलं आर्थिक नुकसान तिला भरून द्यावं लागेल. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असून नेटकरी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.








