MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

पोलीस सेवेत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सुरेशकुमार राऊत यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव.

by प्रशांत शेळके पा.
March 9, 2023
in श्रीगोंदा विभाग
पोलीस सेवेत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सुरेशकुमार राऊत यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव.
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

श्रीगोंदा प्रतिनिधी-

आपल्या वेगळ्या कार्यशैलीने शिरूर तालुक्यात पोलीस खात्याची प्रतिमा उंचावण्याचे काम करणारे शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्जतचे भूमिपुत्र सुरेशकुमार नानासाहेब राऊत यांना पोलीस सेवेत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अहमदनगर येथील माऊली संकुल येथे आयोजित कार्यक्रमात सिने अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार सन्मानाने प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या आई जानकी नानासाहेब राऊत, सरपंच संघटीत चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे, विविध महिला संघटनांना मार्गदर्शन करणाऱ्या उद्योजिका साठे मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

गणपती चौफुला येथे कलशा रोहण सोहळा संपन्न !

सामा. शैक्षणिक व प्रशासकीय सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल मा. श्री. दिपक गणपतराव शिर्के यांना “महाराष्ट्र रत्न” राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.

स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येतो. यंदा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून विविध सरपंच व उल्लेखनीय कार्य करणारे पुरस्कार्थी उपस्थित होत्या. यामध्ये शिरूर पोलीस स्टेशनचे कार्यक्षम व कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कठीण गुन्ह्यांची उकल करून शिरूर तालुक्यात पोलीस खात्याची प्रतिमा उंचावण्याचे काम आपल्या वेगळ्या कार्यशैलीने करून दाखवले आहे. केंद्रीय गृहखात्याने ही त्यांच्या या कार्याची दखल घेतली असून त्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले असून लवकरच प्रदान केले जाणार आहे. तसेच राज्याचे तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते “लोकशाही पुणेरत्न” या पुरस्काराने ही त्यांना सन्मानित करण्यात आले. रांजणगाव गणपती येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सुरेशकुमार राऊत यांनी पोलीस स्टेशनला हायटेक करून आयएसओ मानांकन मिळवून देऊन, अनेक कठीण गुन्ह्यांची उकल करून पोलीस खात्याची प्रतिमा उंचावली होती. त्याबद्दल ही त्यांना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.

सतत वेगवान कामगिरी करत शिरूर तालुक्यात नावलौकिक मिळालेले शिरूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर पोलीस निरीक्षक हे कर्जतचे भूमिपुत्र असून एका सुसंस्कारित कुटुंबातुन पुढे आलेले व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचे वडील नानासाहेब राऊत हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुरेशकुमार चालवत आहेत. कर्जतच्या विविध सामाजिक, शैक्षणिक कार्यात राऊत कुटुंबीय सातत्याने अग्रेसर राहून सामाजिक बांधिलकी जोपासत असते. त्यांचे लहान भाऊ रवींद्र राऊत व भावजय दोघेही प्राथमिक शिक्षक असून  तेही सातत्याने विविध सामाजिक संघटनांशी संबंधित राहून कार्यरत असतात. सुरेशकुमार यांची पत्नी सौ. स्वाती या पुणे महानगरपालिकेत प्राथमिक शिक्षिका आहेत व ज्येष्ठ कन्या दंतरोग तज्ज्ञ म्हणून पदव्युत्तर शिक्षण (एम डी एस) पुणे येथे घेत असून चिरंजीव अमेरिकेत अभियांत्रिकी क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण (एम एस) घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राऊत परिवार सामाजिक जाण नि भान ठेवून जीवनाची वाटचाल करीत असून कर्जतच्या या भूमीपुत्राचा तमाम कर्जतकरांना रास्त अभिमान वाटल्या वाचून राहणार नाही.

प्रशांत शेळके पा.

Tags: AhmednagarMaharashtraSuresh Kumar Raut honored with state level award for his outstanding work in police service
Previous Post

श्री आनंद महाविद्यालयात जागतिक महिलादिन साजरा..

Next Post

महिला दिनानिमित्त कृषी विभाग मार्फत तृन धान्याचे आहारातील महत्व बाबत मार्गदर्शन.

Related Posts

गणपती चौफुला येथे कलशा रोहण सोहळा संपन्न !

गणपती चौफुला येथे कलशा रोहण सोहळा संपन्न !

March 4, 2023
सामा. शैक्षणिक व प्रशासकीय सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल मा. श्री. दिपक गणपतराव शिर्के यांना “महाराष्ट्र रत्न” राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.

सामा. शैक्षणिक व प्रशासकीय सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल मा. श्री. दिपक गणपतराव शिर्के यांना “महाराष्ट्र रत्न” राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.

December 18, 2022

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News