श्री साई नगरीत शिर्डी परिसरात ता-राहाता मध्ये श्री साईबाबांच्या नावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (स्टेडियम) होणेबाबत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे-अध्यक्ष. मान.आमदार.श्री.रोहित दादा पवार साहेब यांना कर्जत येथे रा यु काँ जि – सरचिटणीस बोठे यांनी निवेदन देऊन मागणी करण्यात आली.*
त्यात श्री. रणजित बोठे म्हणाले की, आपले श्रद्धेय श्री साई बाबांच्या नगरीत शिर्डी ता-राहाता परिसरात मुख्यतः श्री साई बाबांच्या नावाने आदरणीय, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपल्या पुढाकारातून, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) व भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान (स्टेडियम) व्हावे. कारण शिर्डी ता-राहाता परिसरात यासाठी लागणाऱ्या सुविधा वीज, पाणी, आंतरराष्ट्रीय विमान सेवा, रेल्वे सेवा, पंचतारांकित हॉटेल सुविधा .इ. महत्वाच्या सेवा सुविधा उपलब्ध आहेत. तसेच या मैदानासाठी लागणारी अपेक्षित जमीन/क्षेत्र सहज उपलब्ध होऊ शकते.
मुख्यतः या आंतरराष्ट्रीय मैदानामुळे शिर्डी ता-राहाता परिसरातील हॉटेल व्यावसायिक व छोटे मोठे उद्योग व्यवसायांना मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकते. त्यामुळे तालुक्याचा व परिसराचा मोठा विकास होऊ शकतो. तसेच श्री साईबाबांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होतील. त्यामुळे परिसरातील हॉटेल व्यवसायीक व छोटे मोठे उद्योग व्यवसायांना हा प्रकल्प नवसंजीवनी देणारा ठरेल.
असा हा महत्वकांक्षी आंतरराष्ट्रीय मैदान प्रकल्प लवकरात लवकर आपल्या पुढाकारातून व आदरणीय, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या प्रयत्नाने पूर्ण व्हावा अशी अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली.
त्यावेळी समवेत उपस्थित राष्ट्रवादीचे प्रा.श्री. हेमंत अनाप सर, श्री. अभिजित बोठे सर, श्री. विनोद वहाडणे, श्री. दिनेश सूर्यवंशी, श्री. सुनील सोनवणे, श्री. अनिल पवार, श्री. सागर बोठे, श्री. अशपाक भाई शेख. आदी मान्यवर, पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.










