पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख
पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील वसंत कचरे यांचा तोडणीसाठी आलेला द्राक्षे बाग व शेतिसाठी आणलेलं खतही जळुन खाक झाले,हि घटना रात्री 1,45, ला घडली बागे शेजारीच रोहित्र आहे अचानक आग लागली ,व तारा तुटुन बागेला केलेल्या मंडप वर पडल्या, आणि पहातां पहाता पुर्ण बागेस आगीने वेढले,आग एवढी भयानक होती की पहाणार्यालाही भिती वाटत होती, बागेत झोपलेला ऋषिकेश कचरे ,हा आगपाहुन उठला, त्यालाही कळाले नाही की नेमकं काय झाल, बाहेर येऊन पाहिलं तेव्हा ट्रान्सफॉर्मर मधून जाळ चालू होता , सुदैवाने जिवितहानी झाली नाही, परंतु हातातोंडाशी आलेला घासाची अक्षरशा राख झाली, तेव्हा, शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी,व रोहित्र अन्य ठिकाणी हलवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे,या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे,व विज महामंडळाचे अधिकारी यांनी हि घटणेची पहाणी केली पाहुया रोहित्र अन्य ठिकाणी हलविण्यात येणार की नाही










