पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख,
पाथर्डी येथील संत तुकाराम विद्यालयातील मुख्याध्यापक भारत ढमाळ यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ नुकताच पार पडला. या निरोप समारंभासाठी अध्यक्षस्थानी एकलव्य शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. प्रताप ढाकणे तर प्रमुख पाहुणे म्हणून आळंदी येथील आचार्य हरिदास पालवे शास्त्री हे होते.

तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. दीपक देशमुख, विश्वस्त श्रीकांत नि-हाळी, सिद्धेश भैय्या ढाकणे, शिवशंकर राजळे, नगरसेवक बंडू पा.बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते रफिक शेख, सिताराम बोरुडे, मेजर शिवाजीराव पडोळे, महादेव पाठक, शंकर चोंथे, हुमायून आतार, विविध विद्यालयाचे आजी माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच भानुदास पवार मामा, प्राचार्य अशोकराव धोंड प्रा, विजयराव घूले व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रताप ढाकणे यांनी मुख्याध्यापक भारत ढमाळ यांच्या प्रामाणिक सेवेबद्दल कौतुक केले तसेच ढाकणे व ढमाळ परिवारातील जुन्या आठवणींना उजाळा दिला व पुढील आयुष्य साठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आचार्य पालवे शास्त्री यांनी भाषणात त्यांच्या शालेय जीवनातील विविध प्रसंग सांगितले व विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध व्यक्तींनी आपल्या भाषणामध्ये मुख्याध्यापक ढमाळ यांच्या आत्तापर्यंतच्या सेवेबद्दल कौतुक केले.
तसेच मुख्याध्यापक ढमाळ सरांनी देखील आपल्या भाषणामध्ये एकलव्य शिक्षण संस्थेसाठी कायम तत्पर असेल असे सांगितले. तसेच कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात मुख्याध्यापक पी. यु.शिरसाठ, बाळासाहेब ढाकणे, सातपुते सर, श्रीमती काळोखे मॅडम, बाळासाहेब वाघ, मधुकर केकान व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश सरोदे व राधाकिसन कोठे सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन पानगे सर यांनी मानले.










