MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

श्री आनंद महाविद्यालयात ” निर्भय कन्या अभियान शिबिर ” संपन्न.

by प्रशांत शेळके पा.
February 16, 2023
in पाथर्डी विभाग
श्री आनंद महाविद्यालयात ” निर्भय कन्या अभियान शिबिर ” संपन्न.
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

प्रतिनिधी वजीर शेख,
आजच्या या स्पर्धात्मक व आव्हानात्मक युगात विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर, आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र व स्वसंरक्षण क्षम असायला हवे असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर शेषराव पवार यांनी केले. विद्यार्थी कल्याण मंडळ सावित्रीबाई फुले ,पुणे विद्यापीठ ,पुणे व श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान शिबिर श्री आनंद महाविद्यालय मध्ये पार पडले. या शिबिराचे अध्यक्ष डॉक्टर शेषराव पवार यांनी शिबिराची उपयुक्तता विद्यार्थिनींना सांगितली. ते म्हणाले की महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मिळेल त्या प्रत्येक गोष्टींतून विद्यार्थ्यांनी काहीतरी ज्ञान संपादन केले पाहिजे. हीच शिदोरी आयुष्यभराची पुंजी बनून राहते. आजची स्त्री ही आत्मनिर्भर होत आहे. त्या अनुषंगाने आपल्या महाविद्यालयात नेहमीच विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात निश्चित होतो.

निर्भय कन्या अभियान शिबिराचे पहिले पुष्प श्री अंबादास साठे कराटे प्रशिक्षण व त्यांचा विद्यार्थी सागर सानप पाथर्डी यांनी गुंफले व विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण दिले. त्यांनी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी कराटेचे स्वसंरक्षणासाठी प्रात्यक्षिक दाखविले व सहभागी विद्यार्थिनींकडून करून घेतले. जर एखादी व्यक्ती मागून किंवा पुढून अकस्मात हल्ला करत असेल तर त्यापासून कसा बचाव करायचा इत्यादी साध्या साध्या गोष्टीतून त्यांनी स्वसंरक्षणाचे धडे दिले. तसेच कराटे मुळे शरीराची लवचिकता ,मनाची एकाग्रता व आत्मविश्वास कसा वाढतो याविषयी प्रदीर्घ मार्गदर्शन केले .कराटे प्रशिक्षणाचा उपयोग दहावी बारावी परीक्षेत वाढीव गुण ,सरकारी नोकरी इत्यादी मध्ये पण होऊ शकतो हे त्यांनी सांगितले.

READ ALSO

लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

शासनाची व मूळ प्लॉट धारकाची फसवणूक प्रकरणी त्या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा – मनसेच्या वतीने तहसीलदार यांचेकडे मागणी.

शिबिराचे दुसरे पुष्प बाबूजी आव्हाड महाविद्यालयातील प्राध्यापिका सुरेखा चेमटे यांनी महिला सबलीकरण या विषयावर गुंफले. आपल्या व्याख्यानात त्यांनी वैदिक काळातील ,इतिहासातील स्त्रिया जिजाऊ माता, झाशीची राणी ,रजिया सुलतान ,इंदिरा गांधी इत्यादी महत्त्वकांक्षी व ऐतिहासिक कामगिरी घडवणाऱ्या स्त्रियांच्या क्षमता ,निर्णय घेण्याची क्षमता, बौद्धिक क्षमता इत्यादी विषयी सांगून विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले. आयुष्य किती मोठे आहे, यापेक्षा कमी दिवसांत आपण मोलाचे काम करू शकतो याचे स्वामी विवेकानंद ,संत ज्ञानेश्वर इत्यादींचे उदाहरणे देऊन त्यांनी कसे अजरामर व उल्लेखनीय कार्य केले याचे स्मरण करून दिले. आपल्या ओघवत्या शैलीत मॅडमने विद्यार्थिनींना आत्मसाक्षरता, आर्थिक साक्षरता, महिला सबलीकरण व त्याची गरज यावर सखोल मार्गदर्शन केले.

या शिबिरातील तिसरे पुष्प प्राध्यापिका अश्विनी थोरात, श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी, यांनी महिला व्यक्तिमत्व विकास या विषयावर गुंफले. मॅडमने व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, त्याची काय गरज आहे, ते आपल्याला प्रभावीपणाने कसे विकसित करता येते यावर उदाहरणासह मार्गदर्शन केले. एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य त्याच्या हातात जरी नसले तरी त्याला त्याचे व्यक्तिमत्व प्रभावी पणे कसे खुलवता येते याचे नेमके उदाहरण देऊन त्यांनी विद्यार्थिनींना आश्वासित केले .पी टी उषा, सायना नेहवाल ,मेरी कोम इत्यादी महिला खेळाडूंपासून ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रियांचे दाखले दिले. एखाद्या महिलेचे व्यक्तिमत्व तिच्या शिक्षणाने ,राहणीमानाने, समाजात वावरताना सहज लक्ष वेधून घेते. आपण जेथे जाऊ तेथे आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा ठसा आपल्याला उमठवता आला पाहिजे हे त्यांनी आवर्जून सांगितले.

या शिबिराचे प्रास्ताविक डॉक्टर जगन्नाथ बरशिले यांनी केले. या शिबिराचे सूत्रसंचालन प्राध्यापिका मनीषा सानप यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका अनिता पावसे यांनी केले . या शिबिरास डॉक्टर जयश्री खेडकर ,प्राध्यापिका रूपाली शिंदे, डॉक्टर बथुवेल पगारे, डॉक्टर अनिल गंभीरे उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

प्रशांत शेळके पा.

Tags: "Nirbhay Kanya Abhiyan Camp" was completed at Shree Anand College.AhmednagarMaharashtraPositive MorningPositive News
Previous Post

दबंगगिरी एक खाकीया मराठी चित्रपटाच्या संदर्भात बोधेगाव येथे बैठक घेऊन चित्रपटाचे नियोजन करण्यात आले.

Next Post

पाडळी येथील वसंत कचरे यांचा तोडणीसाठी आलेला द्राक्षे बाग व शेतीसाठी आणलेलं खतही जळुन खाक, तब्बल 15 – 20 लाखांचे नुकसान.

Related Posts

लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

August 12, 2023
शासनाची व मूळ प्लॉट धारकाची फसवणूक प्रकरणी त्या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा – मनसेच्या वतीने तहसीलदार यांचेकडे मागणी.

शासनाची व मूळ प्लॉट धारकाची फसवणूक प्रकरणी त्या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा – मनसेच्या वतीने तहसीलदार यांचेकडे मागणी.

August 12, 2023

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News