पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख
दिनांक 21/2/2023 मौजे पाडळी ता. पाथर्डी येथील भूमिपुत्र बाबासाहेब फकिरा कांबळे साहेब ( समाज विकास अधिकारी म्हाडा मुंबई ) यांची कन्या डॉ. सोनाली बाबासाहेब कांबळे यांनी वैद्यकीय शास्त्रातील MD ( Doctor of Medicine) हि पदवी सपांदन केली.
डॉ. सोनाली कांबळे या पाडळी मधील तसेच पंचक्रोशीतील बहुजन समाजातील ही पदवी संपादन केलेल्या एकमेव आहेत. ही बाब समाजासाठी देखील गौरवास्पद व अभिमानास्पद आहे त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांच्या पुर्ण कुटुंबाचा सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. सोनाली कांबळे यांनी सांगितले हा प्रवास कठीण होता परंतु जिद्द असेल आणि त्याचबरोबर आपले कुटुंब खंबीरपणे पाठीशी उभे असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्याचबरोबर त्यांचे वडील बाबासाहेब कांबळे म्हणाले की माझ्या मुलीने माझे स्वप्न पूर्ण केले एक वडील म्हणुन माझ्या मुलीचा मला सार्थ आभिमान आहे.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पाथर्डी तालुका महासचिव संजय कांबळे , क्याटिकिस्ट अशोकदादा कांबळे, पास्टर विजय कांबळे, आदर्श शेतकरी नंदु दादा कांबळे,संदीप कांबळे (साहेब) कचरू भाऊ कांबळे, दीपक दादा ढगे साहेब, दीपक कांबळे ( अंकल) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.










