पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख
दिनांक १२ मे रोजी आदिनाथनगर येथील दादा पाटील राजळे शिक्षण संस्थेचे- दादा पाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालय आदिनाथनगर, तालुका:- पाथर्डी येथील अर्थशास्त्र विभाग व वाणिज्यशाखा अंतर्गत वरिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर ऍडव्हान्समेंट कोर्स’ करिता 15 तासांचा कोर्स घेण्यात आला. या कोर्स अंतर्गत पाथर्डी येथील सीए. कु. गौतमी प्रमोद खाटेर यांचे ‘करिअर अपॉर्च्युनिटीज इन काॅमर्स – सीए अँड आयसीडब्ल्यूए’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने माननीय प्राचार्य डॉक्टर राजधर जयवंतराव टेमकर यांच्या हस्ते सीए. कु. गौतमी प्रमोद खाटेर यांना शाल, श्रीफळ, पुष्प व महाविद्यालयाचे नियतकालिक आणि कॅलेंडर देऊन सन्मानित करण्यात आले.
कु. गौतमी खाटेर यांनी विद्यार्थ्यांना सी.ए. करण्यासाठी क्लास कुठे आहेत, त्यासाठी अभ्यासक्रम कोणता असेल, ऑनलाईन क्लास करणे किंवा कसे जॉईन करता येतील, फ्री कोर्स जॉईन करण्याकरिता कोणत्या वेबसाईट आहेत, सी.ए. होण्याकरिता अभ्यास कशा पद्धतीने करावा लागतो, सी.ए. झाल्यानंतर किती उत्पन्न मिळते, व्यवसाय कसा करता येईल, या क्षेत्रातील शंका समाधानासाठी आपणास माझे मार्गदर्शन केव्हाही मिळेल. सीए क्षेत्रातील संधी इत्यादी विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत कु. साक्षी पाखरे यांनीही विद्यार्थ्यांच्या शंका समाधानात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजधर टेमकर होते. पाहुण्यांचे स्वागत परिचय व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुभाष जगन्नाथ देशमुख यांनी केले. तसेच महाविद्यालयाचे नॅक समन्वयक प्राध्यापक डॉक्टर राजू घोलप यांची सहयोगी प्राध्यापक पदावर निवड झाल्याने अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाच्या वतीने सीए. कु. गौतमी प्रमोद खाटेर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्प व महाविद्यालयाचे नियतकालिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्राध्यापक अर्चना नवले, रामेश्वरी सरोदे, स्वाती सातपुते, प्राध्यापक देविदास खेडेकर, डॉक्टर किशोरकुमार गायकवाड तसेच वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉक्टर सुभाष जगन्नाथ देशमुख उपस्थित होते. सदर व्याख्यानाचा लाभ ८५ विद्यार्थ्यांना आणि ७ प्राध्यापकांना झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी पवळे दिशा हिने केले.










