पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख
पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथे हुतात्मा बाबू गेणू संस्थेचे न्यु, इंग्लिश स्कूल पाडळी शाळेच्या आवारात बाल आनंद मेळावा भरवण्यात आला होता, तसेच प्रयोग शाळा, रांगोळी, चित्रकला, दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

आनंद मेळावा भरवण्याचा एकच उद्देश होता की मुलांना व्यवहार कसा केला पाहिजे , देवानं घेवाण करण्यासाठी, बौध्दिक विकास व्हावा,या मधुन ज्ञान प्राप्त होते,या हेतूने आनंद मेळावा भरवण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाडळी गावचे भुषण मा, शेषराव आण्णा कचरे, होते, तसेच न्यु, इंग्लिश स्कूल शाळेचे सेक्रेटरी मा,कुशल दादा भापसे , चेअरमन श्री बाळासाहेब कचरे, उद्योजक भाऊसाहेब कचरे, केंद्र प्रमुख श्री लदाफ सर, उपसरपंच दिलिप आण्णा कचरे, मोहन आमटे, संजय शेठ गांधी, प्रकाश कचरे, शंकर भिसे,शरदतुपे, विष्णुपंत गर्जे,अगदी मान्यवर व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

या आनंद मेळाव्याचा सर्व ग्रामस्थ व पालकांनी मनमुराद आस्वाद घेतला, यावेळी बोलताना कुशल दादा भापसे, म्हटले की एक एक वर्ग डिजिटल करण्याचे आश्वासन दिले,या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु,श्रुष्ठी आमटेंनी केले तर आभार वैष्णवी ताठे हिने मानले.










