पाथर्डी (प्रतिनिधी) वजीर शेख पाथर्डी येथे नुकतेच भव्य दिव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती मा. विरोधी पक्षनेते अजित दादा पवार, आदरणीय प्रताप काका ढाकणे, मा. विनायकराव देशमुख, मा. सुषमाताई अंधारे, माननीय आमदार निलेश लंके साहेब, मा. चंद्रशेखर घुले पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवशंकर दादा राजळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष मा सय्यद गालिब अली, यांच्या उपस्थितीत पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ता श्रीमती अंजूम वजीर बेग यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या तालुका उपाध्यक्षपदी व श्रीमती रेशमा इसाक बेग यांची अल्पसंख्याक ता. सचिव पदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष इरफान भाई खान म्हणाले की तालुक्यामध्ये व शहरामध्ये महिला संघटन मजबूत करून पक्ष वाढीचे काम जोऱ्याने करण्याचा संकल्प केला आहे. हे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष माननीय सय्यद गालीब अली साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न करण्यात आले या निवडीमुळे अल्पसंख्याक महिला वर्ग पक्षाशी मोठ्या प्रमाणात जोडला गेला आहे. आगामी काळात अल्पसंख्याक समाज आदरणीय प्रताप काका ढाकणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये काम करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष इरफान खान यांनी दिला.










