शेवगाव पत्नीस मारहाण – करून शारीरिक व मानसिक त्रास दिल्या प्रकरणी पतीसह सासू, सासरा व दिराविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जरीना रिजवान सय्यद (वय २५ ह.मु. चापडगाव ता.शेवगाव) यांनी फिर्याद दिली असून, त्यावरून पती रिजवान हज्जू सय्यद, सासू मीना परवीन हज्जू सय्यद, सासरा हज्जू सय्यद, दीर रेहान हज्जू सय्यद (सर्व रा. राजूनगर, बीड) यांच्याविरुद्ध शारीरिक, मानसिक त्रास दिल्याबद्दल शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चापडगाव येथील जरीना सय्यद यांचा विवाह बीड येथील रिजवान हज्जू सय्यद याच्याशी चापडगाव येथे दि. ११ जून २०२१ रोजी झाला. लग्नानंतर
काही दिवस चांगले गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी जरीना हीस तुला काम येत नाही, तुला स्वयंपाक येत नाही अशी कारणे दाखवून शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. वेळोवेळी सासू मीना परवीन हज्जू सय्यद, सासरा हज्जू सय्यद, दीर रेहान हज्जू सय्यद यांनी उपाशीपोटी ठेवून रात्री-अपरात्री घराच्या बाहेर काढले. तसेच पतीने घर बांधण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. पैसे नाही आणले तर तुझा कायमचा काटा काढून टाकू असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किरण टेकाळे हे करत आहेत.










