पाथर्डी तालुक्यातील माजी आमदार आप्पासाहेब राजळे पाटील (काका)यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल आदिनाथ नगर येथे गणवेश वाटप.

वृक्षारोपण , गरजू गोरगरीब विद्यार्थिनींना गणवेश वाटप,मार्च 2023 मधे इयत्ता दहावी मध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान, खाऊ वाटप असा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेची विश्वस्त श्रीआर वाय मस्के सर श्री राहुल दादा राजळे जि प सदस्य श्री सुभाषराव बर्डे कृ उ बा सभापती, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची स्वागत /प्रास्ताविक बीआर ताठे सर यांनी केले

मा. राहुल दादा राजळे यांनी शाळेच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले तर सुभाषराव बर्डे यांनी पुढील काळात भरघोस मदत करण्याचेआश्वासन दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू सुरवसे सर यांनी केले आभार अरुण कराळे सर यांनी मांडले.
( पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख )










