मुलीशी पटत नसलेल्या जावयाने सासूला फोनवर शिवीगाळ करून मुलीप्रमाणे तुझेही आयुष्य बरबाद करून टाकेन. अशी धमकी दिल्या प्रकरणी एकावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित महिलेच्या मुलीचे अतुल पडागळे (रा. भिस्तबाग नाका) याच्याशी दीड वर्षापूर्वी कोर्ट मॅरेज झाले. त्यांच्यात नंतर कौटुंबिक वाद झाल्याने मुलगी वर्षभरापासून माहेरी राहते.
दरम्यान, काल दि. ८ रोजी पडागळेने फोन केला व मुलीकडे दे म्हणाला. त्यावर काय काम आहे असे म्हणताच तुझ्या दुसऱ्या मुलीकडे फोन दे असे तो म्हणला. त्यास नकार दिल्यावर अश्लील शिवीगाळ करून तुझ्या मुलीप्रमाणे तुझेही आयुष्य बरबाद करेल, अशी धमकी दिली. या फिर्यादीवरून पडागळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










