अहमदनगर प्रतिनिधी : रतन बनसोडे हे वंचित बहुजन आघाडीचे नाशिक पदवीधर मतदार संघाचे उमेदवार नसून ते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकरांचे प्रतिनिधी आहेत. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघडीचे राज्य उपाध्यक्ष ऍड.सर्वजित बनसोडे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले. नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक ३० जानेवारी रोजी होत आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रतन कचरू बनसोडे यांचा प्रचार मेळावा नुकताच येथील माऊली सांस्कृतिक हॉल येथे घेण्यात आला.
यावेळी ते बोलत होते यावेळी उमेदवार रतन कचरू बनसोडे, राज्य युवा आघाडीचे उपाध्यक्ष चेतन गांगुर्डे, उत्तर महा.विभाग संघटक शरद खरात, उपाध्यक्ष संतोष गलांडे, अहमदनगर जिल्हा निरीक्षक डॉ.सुरेश शेळके, ज्येष्ठ सल्लागार जीवन हरी पारधे, जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे,जिल्हा महासचिव योगेश साठे,युवा जिल्हाध्यक्ष संतोष जठार,उपाध्यक्ष सागर ढगे,प्रसाद भिवसने विनोद गायकवाड,नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे,तालुका महासचिव रवी जाधव,शहर जिल्हा सचिव भाऊ साळवे,शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण ओरे,अमर निरभवणे,आकाश डागवाले,भिंगार उपाध्यक्ष बबलू भिंगारदिवे,गणेश राऊत,विकास गायकवाड,विशेषकुमार सिंग, जिल्हा महिला समन्वयक धनश्रीताई शेंडगे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना ऍड.बनसोडे म्हणाले मला माहित आहे
आपल्यापैकी किती मतदार आहेत.किती नाही.पण या बैठकीचा उद्देश सर्व पदवीधर मतदारापर्यंत पोहचणे हा आहे. उमेदवार रतन बनसोडे यांच्या माध्यमातून ऍड.बाळासाहेब आंबेडकरांची ताकद वाढणार आहे.नगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी साखर सम्राटांच्या अवतीभोवती फिरत असते.त्यांची सत्ता आणि संपत्तीची मस्ती जिरविण्याची ताकद आपल्या मतामध्ये आहे.म्हणूनच नाशिक पदवीधर मतदार संघाचे वंचित बहुजन आघडी उमेदवार रतन कचरू बनसोडे यांनी १ नंबरचा पसंती क्रमांक देऊन येत्या ३० जानेवारीला त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी कर्जत तालुक्याचे अध्यक्ष पोपट शेटे,पदाधिकारी आणि पदवीधर मतदार यांनी रतन बनसोडे यांच्या प्रचारार्थ रथ चे उद्घाटन उमेदवारांच्या आणि पदाधिकारी यांच्या उपस्थीत युवा राज्य उपाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच यावेळी महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष मा.एन.एम.पवळे साहेब यांनी,खंडागळे साहेब, सहकारी मित्र तसेच नाशिक,अहमदनगर,जळगाव, धुळे,नंदुरबार येथील सर्व सेवानिवृत्त कर्मचारी आणि महासंघाशी संलग्न असलेले कर्तव्यावर असलेले कर्मचारी यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील अधिकृत उमेदवार मा.रतन बनसोडे यांना जाहीर पाठिंबा दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव चंद्रकांत नेटके यांनी, आभार प्रदर्शन जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी केले.










