अहमदनगर (प्रतिनिधी)- नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुक 2023 साठी सत्यजित तांबे हे अभ्यासू व चळवळीतील कार्यकर्ते असुन समाजकारणातून व राजकारणातून राज्यभर त्यांचा मोठा जनसंपर्क असल्यामुळे त्यांना विविध संघटना पाठिंबा देत असून राज्यातील 80 हजार होमिओपॅथी डॉक्टरांच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शवला.

माजी आ. डॉ.सुधीर तांबे यांचा सत्कार करताना होमिओपॅथी डॉक्टर्स कृती समितीचे डॉ.विजय पवार, डॉ.प्रशांत शिंदे, डॉ.अशोक भोजने, डॉ.सुबोध देशमुख, डॉ.श्रीराम शिरसाट, डॉ. किरण कर्डिले, डॉ.रवींद्र सातपुते, डॉ.पी एस आहूजा, डॉ.दीपक कारखिले, डॉ.रणजीत सत्रे, डॉ. रोहित करांडे, डॉ.गणेश गावडे, डॉ.सोमीनाथ गोपाळघरे, डॉ.दिनेश मेहत्रे, डॉ.अर्जुन घुले आदी सह डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2013 मध्ये कृती समितीने आझाद मैदानावर पुकारलेल्या आमरण उपोषणावेळी आमदार डॉ सुधीर तांबेनी तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे यशस्वी शिष्टाई केली होती याच कारणामुळे राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांचे प्रश्न सुटण्यासाठी मोठी मदत आमदार डॉ तांबे यांच्या माध्यमातून मिळाली होती. ही आठवण कृती समिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी आवर्जून केली.
येत्या काळात राज्यातील 80 हजार होमिओपॅथी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यां सोडविण्या संदर्भात सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने माजी आ. डॉ.सुधीर तांबे यांनी जाहीरपणे ग्वाही दिली असुन महाराष्ट्र राज्यातील होमिओपॅथि डॉक्टरांच्या कृती समितीच्या वतीने नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी जाहीर पाठींबा दर्शवत. नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातील महाराष्ट्र राज्य होमिओपॅथी डॉक्टर्स कृती समिती या निवडणुकीमध्ये आपणासोबत राहणार आसल्याबाबतचा निर्णय घेण्यात आला असुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.










