स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार 2022 चे वितरण होत आहे.रविवार दि. 25 डिसेंबर 2022 रोजी माऊली संकुल सभागृह अहमदनगर येथे हा पुरस्कार सोहळा होणार आहे. मॉडेल व्हिलेज गोरेगावच्या सरपंच सौ. सुमन बाबासाहेब तांबे यांना 2022 आदर्श सरपंच पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. सामाजिक,राजकीय क्षेत्रात विशेष कार्यासाठी संघाच्या वतीने पुरस्कार दिले जातात.
मॉडेल व्हिलेज गोरेगावच्या सरपंच सौ.सुमन तांबे यांनी गेली पाच वर्षे आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात राज्यातील अनेक पथदर्शी संकल्पना राबविल्या.गावाला सुरक्षा कवच,संपुर्ण गावाला मास्क,स्कार्प वाटप,गावासाठी स्वतंत्र कोविड सेंटरची उभारणी याची नोंद राज्यभर घेतली गेली.
वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, गावातील शाळकरी मुलांच्या समस्या असतील, महिला सबलीकरण,शिक्षक,पालक,विद्यार्थी यांना सोबत घेऊन घेतले विशेष प्रेरणादायी कार्यक्रम,गोरेगावची होमिनिस्टर,बतचट कार्यशाळा,आरोग्य शिबीरे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना,यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्यबद्दल सौ.सुमनताई यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
गोरेगावच्या ग्रामपंचायत सदस्या इंजिनिअर सौ.स्मिता शिवाजी काकडे यांना देखील सरपंच सेवा संघाचा महिला समाजभूषण पुरस्कार 2022 देण्यात येत आहे.आरोग्य,शिक्षण,पर्यावरण यामध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे सौ.सुमन तांबे या सरपंच पदी तर सौ.स्मिता काकडे या ग्रामपंचायत सदस्य पदी दोघीही नुकत्याच दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा..!










