नगर प्रतिनिधी :- अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे यांनी इंजिनिअर बी बी चौधर अभियंता विद्युत विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ करणेबाबद व त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करावी ही तीन महिन्यापासून लढा देत आहे. ग्रामविकास विभाग मंत्रालयाचे कक्ष अधिकारी माननीय सुभाष राठोड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर 30 सप्टेंबर 2022 रोजी पत्र देऊन परवानगी देनेबाबद कळवले.
जिल्ह्यातील मोठे पुढारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहे की काय असा संशय. जिल्हा परिषदेचे कर्मचारी जनतेसाठी तीन तेरा आणि नऊ बारा असे जोरदार काम करत आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे कर्मचारी जोमात आणि नागरिक कोमात. सध्याचे वातावरण जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कामकाज रामभरोसे. कुठेतरी ऐकले होते राम तेरी गंगा मैली.
मौजे खतगाव टाकळी तालुका नगर जिल्हा अहमदनगर येथे इंजिनिअर जोशी उप अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांनी बंधाऱ्याची तांत्रिक मान्यता घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामे करतांना परस्पर बदलून कामे केल्याने याप्रकरणी तत्काळ चौकशी करावी कठोर कारवाई करणेबाबद पत्रव्यवहार करूनही कार्यवाही झाली नाही. तीन दिवस झाले बेमुदत उपोषण जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे आणि त्यांचे सहकारी तालुका अध्यक्ष निवृत्ती कासोटे, धर्मरक्षक गणेश चौगुले सर यांनी या उपोषणाला भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.
धर्मरक्षक गणेश चौगुले यांनी वरिष्ठ अधिकारी आणि जबाबदार अधिकारी यांनी कायद्याचे पालन करावे अन्यथा कायदा हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही ! जर कायद्याचे पालन केले तर जाहीर सत्कार करू आणि नाही केले तर होणाऱ्या परिणामास जिल्हा कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद संबंधित विभाग जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे यांनी उद्या दिनांक 22 जून 2023 रोजी आत्मदहन करणार असल्याचे लेखी जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. अन्याय अत्याचार विरोधात लढत असताना जिझुन मारण्यापेक्षा लढून मेलेले कधीही चांगले. एक अरुण रोडे गेला तर देशभर लाखो अरुण रोडे तयार होईल हे लक्षात असू द्या. भारतीय राज्यघटनेवर मला पूर्ण विश्वास आहे. जगेल तर समाजाच्या हितासाठी आणि मरेल तर सामान्य नागरिक यांच्या कल्याणासाठी असे अरुण रोडे म्हणाले.









