तरुणाचा जाळलेला मृतदेह आढळला असून ओळख समोर आली नाही, अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल.अहमदनगर नगर- औरंगाबाद : – रोडवरील शेंडी (ता. नगर) शिवारातील वांबोरी फाटा परिसरात शनिवारी (दि.७) जळालेल्या अवस्थेत आढळून आलेला मृतदेह १८ ते २० वर्षीय तरुणाचा असून त्याची ओळख अद्याप समोर आलेली नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
याप्रकरणी पोलिस अंमलदार रमेश थोरवे यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी सकाळी वांबोरी फाटा परिसरातील बाळासाहेब गणपत आहे. मिस्कीन यांच्या शेतात एका बॅगमध्ये जळालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. परिसरातील ग्रामस्थांनी याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली होती.
घटनास्थळी पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक अनिल म कातकाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी भेट दिली. दरम्यान शवविच्छेदन झाल्यानंतर सदर युवकाचा खून झाल्याचे समोर आले. यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आता खून झालेला हा तरुण कोण, हे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन तर एमआयडीसी पोलिसांचे दोन पथके कार्यरत करण्यात आली आहेत.









