अहमदनगर : पतीच्या त्रासाला कंटाळून माहेरी आई-वडिलांकडे राहणाऱ्या पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटसअॅप स्टेटसवर ठेवले. तसेच फिर्यादीच्या मामाला ते फोटो पाठवले.
फिर्यादीला फोन करून तू जर माझ्या मनासारखी वागली नाही, तर फोटो सर्वत्र व्हायरल करण्याची धमकी | दिल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित पत्नीच्या फिर्यादीवरून तिच्या पतीविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१० एप्रिल ते ९ डिसेंबर या आठ महिन्यात पतीने वारंवार त्रास दिल्याची तक्रार पीडित पत्नीने केली आहे. यापूर्वीही पीडितेच्या बहिणीने त्याच्या विरोधात फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पीडित पत्नीची फिर्याद दाखल करून घेत पती विरुद्ध विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्याद्वारे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.









