मा.महोदय,
कारणे उपरोक्त विषयास अनुसरून आपणास निवेदन देण्यात येते की,
सकल मराठा समाज गेली ४० ते ५० वर्षापासुन मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणुन आजतागायत मागणी करत आहे परंतु मराठा समाजास आजपावेतो कायदेशीर असे आरक्षण मिळालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने दि. ५/५/२०२१ रोजी ५० टक्केच्या वरती आरक्षण देता येत नसल्यामुळे सदरची याचिका रद्द केलेली आहे. सध्याच्या परिस्थितीत मराठा समाज आर्थिक मागास असतांनीही व तसा गायकवाड आयोगाचा अहवाल असतांनाही दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.
विषय क.१ नुसार राज्य सरकारने केंद्र सरकारला कायदेशीर पाठपुरावा करून येणारे अधिवेशनात लोकसभेमध्ये भारतीय राज्य घटनेत घटना दुरूस्ती करून शेडयुल ९ मध्ये मराठा समाजास आरक्षण दिल्यास कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे. वास्तविक अनेक राज्यांमध्ये ५० टक्केच्या वरती आरक्षण दिलेले आहे परंतु आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले नाही सदरच्या याचिका प्रलंबित आहे परंतु इतर राज्यांनी दिलेले आरक्षणाचा फायदा तेथील समाज घेत आहे.
विषय क्र. २ नुसार सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित असलेली क्युरेटिव्ह पिटीशन बाबत देखील राज्य सरकारने व केंद्र सरकारने पाठपुरावा करून कायदेशीर मार्गाने निकाली काढल्यास मराठा समाजाचे आरक्षण अबाधित राहणार आहे त्यामुळे देखील त्याचेवरती लवकरात लवकर सुनावणी घेणे गरजेचे झालेले आहे.
विषय क. ३ व ४ नुसार राज्य सरकारने केंद्र मागास आयोग यांचेकडे मराठा समाजास आरक्षणाबाबत पाठपुरावा करणे गरजेचे असुन सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे कायदयाच्या चौकटीत बसुन व भविष्यात कुठलेही आव्हान आले तरी मराठा समाजाचे आरक्षण अबाधीत राहील त्याबाबत देखील उचित कारवाई करावी लागणार आहे.
तरी वरील विषयाप्रमाणे /मागणीप्रमाणे दि. ११/९/२०२३ रोजी वार सोमवार सकाळी ११ वाजेपासुन ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज, कोपरगांव येथे मागणी पुर्ण होईपर्यंत आमरण उपोषण व साखळी उपोषण सकल मराठा समाज शहर व तालुकाचे वतीने करणेत येणार आहे.
आमरण उपोषण कर्ते
(१) अॅड. योगेश साहेबराव खालकर, मो.नं. ८९९९८८०७४० अनिल शिवाजीराव गायकवाड, मो.नं. ९५६१८१९६७१
२) ३) विनय सुभाषराव भगत, मो.नं. ९५९५२०३९९९













