MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

शासनाची व मूळ प्लॉट धारकाची फसवणूक प्रकरणी त्या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा – मनसेच्या वतीने तहसीलदार यांचेकडे मागणी.

by प्रशांत शेळके पा.
August 12, 2023
in पाथर्डी विभाग
शासनाची व मूळ प्लॉट धारकाची फसवणूक प्रकरणी त्या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा – मनसेच्या वतीने तहसीलदार यांचेकडे मागणी.
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख,

पाथर्डी शहर व तालुक्यातील मोकळी शेत जमीन व बिगरशेती प्लॉट हेरून ती मालमत्ता ज्याचे नावे आहे त्या व्यक्तीचे बोगस आधारकार्ड बनवून संबधित मालमत्तेची लाखो रुपयांना विक्री करण्याचें रॅकेट नुकतेच उघडकीस आले असून ज्यांचेवर मालमत्तेचा मूळ मालक खातरजमा करून त्याने सादर केलेलीं स्वतःच्या ओळखपत्राची कागदपत्रे बोगस आहेत की नाही हे तपासून मग ते दस्त नोंदणी करण्यासाठी दाखल करून घेण्याची जबाबदारी आहे त्या दुय्यम निबंधक पाथर्डी व दुय्यम निबंधक औरंगाबाद क्र.६ यांचेवर दस्त नोंदणी करते समयी शासनाच्या मार्गदर्शक नियमांचा भंग करून स्वतःचे आर्थिक लाभापोटी आपल्या कर्तव्यात कसूर करून शासनाची व संबधित मालमत्ता धारकांची फसवणुक केलेली असल्यामुळे त्यांचेवर फसवणुकीसह,कर्तव्यात कसूर केले प्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाथर्डी तालुका मनसे च्या वतीने तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ व परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी तहसीलदार श्याम वाडकर यांचेकडे केली आहे.

READ ALSO

लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

पाथर्डी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पदी राहुल ढाकणे यांची निवड, शहराध्यक्ष आणी इतर पदाधिकारी यांच्या निवड करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती देताना जिरेसाळ यांनी सांगीतले की, पाथर्डी शहर हद्दीतील बसवेश्वर नगर स्थित सर्व्हे नंबर २८/६ मधील फ्लॅट क्र.८ हा अनिल राजनाथसिंग यादव व सुनील राजनाथसिंग यादव यांनी दि.२०/०१/२०१८ रोजी मा.दुय्यम निबंधक पाथर्डी यांचे समोर रजिस्टर दस्त करत खरेदी केलेला असून तशी नोंद सर्व महसुल दफ्तरी करण्यात आलेली आहे.

सदर दोनही यादव बंधू पाथर्डी शहरात मजुरीचा व्यवसाय करत असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व पुढील जिवनात राहण्याची सोय असावी या दृष्टीने त्यांनी सदर प्लॉट खरेदी केलेला आहे,मात्र असे असताना…

दुय्यम निबंधक औरंगाबाद क्र.६ यांनी सदर पाथर्डी येथील प्लॉट क्र ८ चे स्वतःचे नावे कुलमुखत्यार पत्र करण्यासाठीं आलेल्या बोगस व्यक्तीचे हक्कात सदर यादव बंधूचे नावाचे बोगस आधारकार्ड व इतर कागदपत्रांची शासनाचे मार्गदर्शक नियमांनुसार कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता,स्वतः चे आर्थिक लाभापोटी दि.१६/०६/२०२३ रोजी अ ग ग -६/५०२४/१५/२०२३ या दस्ताद्वारे सदर यादव बंधूंच्या नावे असलेल्या प्लॉट क्र.८ चे कुलमुखत्यार पत्र दस्त नोंदणी करून दिले..

त्याच प्रमाणे दुय्यम निबंधक पाथर्डी यांनी त्यापुढे कहर करत दि.२७/०६/२३ रोजी सदर प्लॉट चे बोगस खरेदी दस्त नोंदणी करत त्यामध्ये खरेदी देणार म्हणुन अनिल यादव व सुनील यादव यांचा उल्लेख असताना देखील त्यांचे अनुपस्थित त्यांचे खोट्या सह्या असलेला खरेदी दस्त खरेदी देणार म्हणुन सदर प्लॉट चे बोगस कुलमुखत्यार पत्र तयार करून घेतलेल्या व्यक्तीची लिहून देणार म्हणुन दस्त गोषवरा भाग २ मध्ये सही घेत प त ड २४७५/३०/२०२३ या बोगस खरेदी दस्ताद्वारे तिसऱ्याच व्यक्तिच्या नावे नोंद करून दिला आहे.

याचप्रमाणे दुय्यम निबंधक,पाथर्डी यांनी दि.२७/०७/२३ रोजी बोगस रजिस्टर दस्त क्र.प त ड/२९३९/१६/२०२३ द्वारे पाथर्डी शहर हद्दीतील स.न.२८/६ मधील प्लॉट क्र.७ चे मूळ मालक श्री.अनिल अर्जुन गर्कल यांचा प्लॉट अशाच प्रकारे स्वत:च्या आर्थिक लाभापोटी,सदर प्लॉट चे मूळ मालक हजर नसताना त्यांचे अपरोक्ष त्यांचे ऐवजी बोगस व्यक्तीची लिहून देणार म्हणुन नोंद करत सदर प्लॉट तिसऱ्याच व्यक्तिच्या नावे खरेदी दस्त नोंदणी करून दिलेला आहे.

प्रत्येक दस्त नोंद करते समयी शासनाने दुय्यम निबंधक यांना मार्गदर्शक तत्वे आखुन दिलेली असून दस्त नोंदणी करण्यासाठी आलेल्या व्यक्तींची शासकीय नियमानुसार / आधार प्रमाणीकरण करून केल्याखेरीज दस्त नोंदणी करु नये असे स्पष्ट निर्देश असताना देखील वरील दुय्यम निबंधक यांनी स्वतःचे आर्थिक लाभापोटी शासनाची सर्व मार्गदर्शक तत्वे पायदळी तुडवत शासनाची व संबधित प्लॉटच्या खरे मालक असलेल्या मालमत्ता धारकांची घोर फसवणूक केलेली असून यामुळे वरील दोन्ही मालमत्ता धारकांसह  तालुक्यातील इतरही मालमत्ताधारक पुरते हवालदिल झालेले असून पै पाई जमा करून,कष्टानं विकत घेतलेली शेतजमीन,प्लॉट हा आपल्याच नावावर आहे की परस्पर दुसऱ्याच्या नावावर झाला आहे अशी भीती तालुक्यातील मालमत्ता धारकांमध्ये निर्माण झाली आहे.

अशाप्रकारे दुय्यम निबंधक यांच्या भ्रष्ट व गलथान कारभारामुळे आपली स्वकष्टार्जित मालमत्ता डोळ्यादेखत दुसऱ्याच्या नावावर बघून एखाद्या तणावग्रस्त मालमत्ता धारकाने स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून घेतले तर त्याला जबाबदार कोण.? तहसिल कार्यालयात असलेले दुय्यम निबंधक याबाबत “आम्हीं शासनाला महसूल गोळा करून देतोत” या सदराखाली स्वतःची तुंबडी भरण्यासाठी असे भ्रष्ट व गैरप्रकार करत असतील तर त्यांनाही कायद्याचा चाप बसने आवश्यकच आहे.

त्यासाठी अश्या प्रकारे स्वतःचे आर्थिक लाभापोटी शासनाची व सर्वसामान्य मालमत्ता धारकांची फसवणुक करणाऱ्या दुय्यम निबंधक औरंगाबाद क्र.६ व दुय्यम निबंधक, पाथर्डी यांचेवर भा.द.वि.क. ४२०,१२० ब व ३४ अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व या दोन्ही दुय्यम निबंधक यांनी अशा प्रकारे या व्यतिरिक्त केलेल्या बोगस रजिस्टर दस्तांची पोलिस तपास करून चौकशी करण्यात यावी व त्याआधारे  दोषींवर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा पीडित मालमत्ता धारकांच्या वतीने या विषयावर मा.जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्याचा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आलेला आहे.

प्रशांत शेळके पा.

Tags: a criminal case should be filed against them - on behalf of the MNSa request was made to the Tehsildar.AhmednagarCrimeIn the case of cheating the government and the original plot holderMaharashtra
Previous Post

पाथर्डी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पदी राहुल ढाकणे यांची निवड, शहराध्यक्ष आणी इतर पदाधिकारी यांच्या निवड करण्यात आली.

Next Post

लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

Related Posts

लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

August 12, 2023
पाथर्डी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पदी राहुल ढाकणे यांची निवड, शहराध्यक्ष आणी इतर पदाधिकारी यांच्या निवड करण्यात आली.

पाथर्डी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पदी राहुल ढाकणे यांची निवड, शहराध्यक्ष आणी इतर पदाधिकारी यांच्या निवड करण्यात आली.

July 31, 2023

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News