नेवासा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र नेवासा शहर जिल्हा परिषद क्षेत्रातून वगळणेत आल्याने नेवासा शहरात न ठेवता इतरत्र हलविण्याची हालचाल प्रशासकीय स्तरावर सुरू झाल्या आहेत.
यामुळे नेवासकरांचे मोठे नुकसान होणार आहे.आपला दवाखाना ही योजना प्राथमिक आरोग्य केंद्रास पर्याय ठरू शकत नाही.आपला दवाखाना हा केवळ बाह्य रुग्णासाठी असून त्यात अनेक असुविधा आहे.
तसेच नगरपंचायत देखील नागरिकांना आरोग्य सुविधा देणेस असमर्थ आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र हलवू नये या करिता आम आदमी पक्षाचे वतीने तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देणेत आले
यावेळी ॲड.सादीक शिलेदार,शहराध्यक्ष संदीप आलावणे,प्रवीण तिरोडकर, संजय वैरागर,अशपाक जहागीरदार हजर होते……..










